सारथीच्या विविध योजनांबाबत पंढरपूरच्या संतोष डोंगरे यांनी केला जनजागृतीपर प्रसार - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, August 21, 2023

सारथीच्या विविध योजनांबाबत पंढरपूरच्या संतोष डोंगरे यांनी केला जनजागृतीपर प्रसार

 सारथीच्या विविध योजनांबाबत पंढरपूरच्या संतोष डोंगरे यांनी केला जनजागृतीपर प्रसार

पंढरपूर (कटूसत्य वृत्त):-छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) पुणे या संस्थेच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती घेवून पंढरपूर येथील संतोष दत्तात्रय डोंगरे यांनी खेडभाळवणी ता.पंढरपूर येथे त्याबाबत जनजागृतीपर प्रसार करण्याचे काम केलेले आहे. यावेळी सरपंच डॉ.संतोष साळुंखे, शुभम पवार, कल्याण पवार,साळुंखे यांच्यासह ग्रामस्थ, पालक, विद्यार्थी उपस्थित होते.
संतोष दत्तात्रय डोंगरे यांनी सारथी संस्थेची स्थापना त्यांची मुख्य कार्यालये, विभागीय कार्यालय व त्या माध्यमातून मराठा, कुणबी, मराठा कुणबी व कुणबी मराठा यांच्यासाठी काम करीत असून तसेच युपीएससी, एमपीएससी, परदेशी भाषा, सेट नेट, एम.फील पीएचडी, छत्रपती संभाजी महाराज सारथी युवा व्यक्तिमत्व विकास, संगणक कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम, श्रीमंत मालोजीराजे भोसले सारथी कौशल्य विकास कार्यक्रम इंडो जर्मन टूल रूम, राजमाता जिजाऊ सारथी कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम,दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती योजना, कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना, डॉ.पंजाबराव देशमुख सारथी उच्च शिक्षण देशांतर्गत शिष्यवृत्ती योजना या वर नमूद केलेल्या घटकांसाठी राबविण्या येत असून भविष्यकालीन योजनांचा आराखडा याबाबत वाचन करत उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन केले.
यावेळी खेडभाळवणी गावचे सरपंच डॉ.संतोष साळुंखे यांनी संतोष दत्तात्रय डोंगरे यांनी सारथीच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची सविस्तरपणे माहिती पालकांना, विद्यार्थ्यांना व ग्रामस्थांना दिली त्यामुळे अनेकांना यातून पुढील दिशा मिळणार आहे असे सांगत त्यांचे आभार मानले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages