रोटरी क्लब ऑफ कळंब सिटीच्या वतीने मूकबधिर मुलांचा सामूहिक वाढदिवस साजरा
(सलग दहा वर्षापासून हा उपक्रम चालू)
,कळंब (कटूसत्य वृत्त):-सलग दहा वर्षापासून रोटरी क्लब ऑफ कळंब सिटी च्या वतीने १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त मूकबधिर मुलांचा सामूहिक वाढदिवस साजरा करण्यात येतो. या ही वर्षी १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनानिमित्त तुळजाई प्रतिष्ठान बहुउद्देशीय संस्था पानगाव संचलित संत ज्ञानेश्वर महाराज निवासी मूकबधिर विद्यालय कळंब येथे रोटरी क्लब ऑफ कळंब सिटी चे सचिव सुदर्शन नारकर यांच्या शुभ हस्ते महात्मा गांधीजींच्या प्रतिमेचे पूजन करून ध्वजारोहण करण्यात आले.
नंतर रोटरी क्लब ऑफ कळंब सिटीच्या वतीने मूकबधिर मुलांचा सामूहिक वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला.
यावेळी मूकबधिर मुलांना टी-शर्ट व शैक्षणिक साहित्य, खाऊचे वाटप, आवश्यक किट आणि पाणीपुरीचे वाटप करण्यात आले. तसेच मूकबधिर मुलांसमवेत सैराट गाण्यावर डान्स करण्यात आला. यावेळी रोटरी क्लब च्या वतीने सचिव सुदर्शन नारकर म्हणाले की आम्ही प्रत्येक वर्षी आपल्या मुलां सोबत त्यांचा १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त सामूहिक वाढदिवस साजरा करू व आम्ही सदैव आपल्या सोबत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
यावेळी रोटरी क्लब ऑफ कळंब सिटीचे
.अध्यक्ष सुदर्शन नारकर व रोटरी क्लब ऑफ कळंब सिटी चे सचिव साजेद चाऊस, प्रोजेक्ट चेअरमन किरण चव्हाण चव्हाण व सह प्रोजेक्ट चेअरमन निखिल भडंगे व बालाजी बाहेती व त्यांचा परिवार तसेच रोटरी क्लब ऑफ कळंब सिटी चे सर्व पदाधिकारी सर्व रोटरीयनस यांच्या उपस्थितीत मूकबधिर मुलांचा सामूहिक वाढदिवस साजरा करुन साहित्य वाटप करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक निखिल भडंगे यांनी केले.तर सू्त्रसंचालन आश्रुबा कोठावळे यांनी केले.
यावेेळी तुळजाई प्रतिष्ठान बहुउद्देशीय संस्थेचे सचिव .शहाजी चव्हाण व संत ज्ञानेश्वर महाराज निवासी मूकबधिर विद्यालय कळंब चे मुख्याध्यापक बालाजी जाधवर, सर्व कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

No comments:
Post a Comment