Hot Posts

6/recent/ticker-posts

खोंदला येथे अपात्र झालेल्या सरपंच यांनी त्यांच्या कालावधीत घेतलेल्या ठराव रद्द करून झालेल्या कामाची चौकशी करा!

 खोंदला येथे अपात्र झालेल्या सरपंच यांनी त्यांच्या कालावधीत  घेतलेल्या ठराव रद्द करून झालेल्या कामाची चौकशी करा! 


१५ ऑगस्ट रोजी  ग्रामस्थांचा उपोषणाचा इशारा .
(कटूसत्य वृत्त):-कळंब /  तालुक्यातील खोंदला येथे अपात्र झालेले सरपंच निवृत्ती पवार यांच्या कालावधीत घेतलेले सर्व ठराव रद्द करावे व त्याचप्रमाणे त्यांनी केलेल्या सर्व कामाची विशेष पथक नेमून रितशिर चौकशी करावी अशी मागणी खोंदल्याचे  माजी सरपंच ज्ञानेश्वर मुळीक यांच्यासह गावकऱ्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे .
जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की खोंदला ग्रामपंचायत मध्ये विविध विकास कामे केली असून या विकास कामाची चौकशी व्हावी त्याचबरोबर ग्रामपंचायत च्या नवीन इमारतीचे बांधकाम ठराव घेतलेल्या जागेवर न करता दुसऱ्याच ठिकाणी कमी जागेत बांधकाम करून निधीचा अफरातफर केली त्याचप्रमाणे नवीन बांधलेल्या ग्रामपंचायत मध्ये शौचालय न बांधकाम करताच इमारत पूर्ण बांधकाम झाल्याचे प्रशासनास दाखवण्यात आले. या इमारतीची विशेष पथका मार्फत रीतशीर चौकशी करावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली आहे .  त्याचबरोबर रोजगार हमी योजनेतून खोंदला गावात माळवाट चे काम ठराव न घेताच करून त्याचे पैसेही हडप केले आहेत . त्याचप्रमाणे गावातील असे अनेक रस्ते ग्रामपंचायत मध्ये ठराव न घेताच परस्पर केल्याने व त्याचा निधी हडप केल्या चे  समोर आले आहे . अपात्र सरपंच यांनी दिशाभूल करणारे कागदपत्र जोडून निवडणूक लढवलीत्यानंतर कागदपत्राचे पडताळणी झाल्यानंतर ते अपात्र झाले आहेत .  त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी ही  गावकऱ्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे लावून धरली आहे .  पंधराव्या वित्त आयोगातील पैशावर गावातील विविध विकास कामे अपात्र सरपंचाने घाईघाईने केले आहेत .रोजगार हमी योजनेतून बोगस  मजूर दाखवून वृक्षारोपणाचा कार्यक्रम न घेताच सर्व झाडे कागदावर चिटकून त्याचे दिले हडप केले आहेत . जलजीवन मिशनच्या नावाखाली गावात खोदकाम केले आहे पण काम मात्र झाले नाही .  या कामामुळे गावात मोठमोठे खड्डे पडले असून त्याचा त्रास गावकऱ्यांना होत आहे . हे खड्डे तात्काळ बुजवावे व सर्व वरील कामाची चौकशी १२  ऑगस्टपर्यंत करावी अन्यथा सर्व ग्रामस्थ १५  ऑगस्ट रोजी गटविकास अधिकारी कार्यालय पंचायत समिती समोर उपोषण करण्याचा इशारा गावकऱ्यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे . या निवेदनावर माजी सरपंच ज्ञानेश्वर मुळीक, भागवत लांडगे , बालाजी लांडगे , कोंडीबा लांडगे ,बाळासाहेब मुळीक , दत्तात्रेय लांडगे , बाबुराव लांडगे ,सचिन सावंत , भास्कर लांडगे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत .
         
              चौकट
जिल्हाधिकारी कार्यालयास पत्र धडकताच गटविकास अधिकारी यांनी दोन सदस्य चौकशी नेमली आहे . यामध्ये उपविभागीय अभियंता बांधकाम विभाग जिल्हा परिषद उस्मानाबाद व पंचायत समितीचे विस्ताराधिकारी टी .जे . जाधव यांचा यात समावेश आहे . हे दोन अधिकारी या संबंधाची  चौकशी करणार आहेत .  चौकशी निपक्षपाती करावी अशी मागणी ही गावकऱ्यांनी केली आहे .  


Reactions

Post a Comment

0 Comments