Hot Posts

6/recent/ticker-posts

मध केंद्र योजनेसाठी अर्ज करावेत जिल्हा ग्रामो्‌द्योग अधिकारी यांचे आवाहन

 मध केंद्र योजनेसाठी अर्ज करावेत जिल्हा ग्रामो्द्योग अधिकारी यांचे  आवाहन


सोलापूर(कटूसत्यवृत्त):-महाराष्ट्र राज्य खादी  ग्रामोद्योग महामंडळामार्फत मध केंद्र योजनेसाठी  ११ सप्टेंबर २०२३  पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी ध्रुवकुमार बनसोडे यांनी केले आहे.

  मध उद्योगांना मोफत प्रशिक्षणसाहित्य स्वरूपात ५० टक्के अनुदान  ५० टक्के स्वगुंतवणूकशासनाच्या हमीभावाने मध खरेदीविशेष छंद प्रशिक्षणाचे सुविधामधमाशा संरक्षण  संवर्धनाची जनजागृती अशी या योजनेचे वैशिष्ट्ये आहेतवैयक्तिक मधपाळ योजनेसाठीअर्जदार साक्षर असावास्वतःची शेती असल्यास प्राधान्य राहीलवय १८ पेक्षा जास्त  असावेकेंद्र चालक प्रगतशील मधपाळ योजनेसाठी अर्जदार दहावी पास असावा वय वर्ष २१ पेक्षा जास्त असावे . व्यक्तींच्या नावे अथवा त्या व्यक्तींच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तींच्या नावे किमान एक एकर शेत जमीन किंवा भाडे तत्त्वावर घेतलेली शेतजमीन असावीतसेच लाभार्थीकडे मधमाशापालन प्रजनन  मध उत्पादनात बाबतीत लोकांना प्रशिक्षण देण्याची क्षमता  सुविधा असावीकेंद्र चालक संस्थेसाठी संस्था नोंदणीकृत असावीसंस्थेच्या मालकीची किंवा दहा वर्षासाठी भाडे तत्त्वावर घेतलेली किमान एक एकर शेत जमीन तसेच संस्थेच्या नावे किमान एक हजार चौरस फूट सुयोग्य इमारत असावीमधमाशापालन प्रजनन  मध उत्पादनात बाबतीत लोकांना प्रशिक्षण देण्याची क्षमता  सुविधा असावी.

   अधिक माहितीसाठी जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी कार्यालय,(दूरध्वनी क्र.०२१७-२६००१२८सोलापूर यांच्याशी संपर्क साधावा असे अवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी बनसोडे यांनी केली आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments