राष्ट्रीय पशुधन अभियान योजनेचा जिल्ह्यातील पशुपालकांनी लाभ घ्यावा
सोलापूर(कटूसत्यवृत्त):-जिल्ह्यात केंद्रशासन पुरस्कृत राष्ट्रीय पशुधन अभियान योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेसाठी www.nlm.udyamimitra.in या संकेतस्थळावर अर्ज करून जिल्ह्यातील जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा असे, आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांनी केली आहे.
राष्ट्रीय पशुधन अभियानाचा उद्देश रोजगार निर्मिती, उद्योजकता विकास, पशुंची उत्पादकता वाढविणे यासाठी असून या विकास कार्यक्रमांतर्गत एका छताखाली मांस, बकरीचे दूध, अंडी उत्पादन वाढविणे असा आहे. तसेच असंघटित क्षेत्रामध्ये उपलब्ध उत्पादनासाठी विक्री करिता व कच्चामाल उपलब्ध होण्याकरिता संघटित क्षेत्राशी उद्योजकता विकास साधण्यासाठी होणार आहे.
जिल्ह्यातील ११ तालुक्यातून जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करावेत. अधिक माहितीसाठी तालुकास्तरावर संबंधित पंचायत समितीच्या पशुधन विकास अधिकारी (विस्तार) यांच्याकडे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांनी केले आहे.
0 Comments