...त्या घटनेतील आरोपीकडून गाडी,हत्यारे पोलिसांकडून जप्त
माढा (कटूसत्य वृत्त):-
प्रेम विवाहाला विरोध करीत असल्यामुळे जन्मदात्या वडिलांचेच पाय तोडण्याची मुलीने प्रियकराच्या मदतीने सुपारी दिल्याच्या घटनेने माढा शहर हादरले असुन महेंद्र शहा यांची प्रकृती अजुन ही चिंताजनकच आहे. महेंद्र शहा यांच्यावर जीवघेणा हल्ला मुलीनेच घडवला होता.या प्रकरणी मुलगी साक्षी शहा,प्रियकर चैतन्य कांबळे यांचेसह एकुण ६ जणांविरुद्ध ३०७ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन माढा न्यायालयाने त्यांना ११ ऑगस्ट पर्यत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठोठावलेत.त्यानुसार माढा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बी.एस.खणदाळे व पोलिस उपनिरिक्षक मोहम्मद शेख हे पोलिस पथकासमवेत आरोपी कडुन गुन्ह्यात वापरलेल्या वस्तु जप्त करुन घटनेचे पुरावे गोळा केले जात आहेत.आनंद उर्फ बंड्या जाधव यांचेकडून घराच्या समोरुन हल्यात वापरलेली दुचाकी जप्त करण्यात आली असुन अतिश लंकेश्वर याने माढा बसस्थानक परिसरातुन शहा यांचेवर हल्ला करण्यासाठी २ खोऱ्याचे दांडे देखील विकत घेतले होते.त्या दुकानाच्या ठिकाणाहून लंकेश्वर याचे फोटो घेण्यात आलेत.हल्ला करण्या अगोदर व नंतर साक्षी सोडता अन्य ५ संशयित आरोपी कुठे एकत्रित आले होते.त्या हाॅटेल सह पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही फुटेज देखील पोलिसांनी पुराव्या कामी हाती घेतले आहे.
कोट) घटनेचा सर्व बाजूनी तपास केला जात असुन यात नवी माहिती काही मिळते का याचा शोध सुरु असुन या प्रकरणात भक्कम पुरावे गोळा केले जात आहेत.-मोहम्मद शेख तपास अधिकारी & पोलिस उपनिरीक्षक माढा पोलिस स्टेशन
0 Comments