शासकीय मैदान येथील खेळाडूनी घेतली पंचप्रण ची शपथ
“मेरी माटी मेरा देश“ उपक्रमांतर्गत सेल्फी बुथचे जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार यांच्याहस्ते शुभारंभ
सोलापूर,(कटूसत्यवृत्त):-भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव अंतर्गत संपूर्ण देशभरात 'मेरी माटी मेरा देश' हा उपक्रम राबविला जात आहे. या उपक्रमांतर्गत भारत सरकार माहिती आणि प्रसारण मंत्रालय केंद्रीय संचार ब्यूरो सोलापूर आणि जिल्हा क्रीडा कार्यालय यांच्यावतीने नेहरू नगर येथील शासकीय क्रीडांगणावर जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार यांच्यासह आंतरराष्ट्रीय खेळाडू अरुण राठोड आणिराष्ट्रीयखो- खेळाडू अर्चना व्होनमाने यांनी उपस्थित अधिकारी, नागरिक व खेळाडूंना पंचप्रण ची शपथ दिल
यावेळी सहायक प्रसिद्धी अधिकारी अंबादास यादव, न्यू जॉगर्स फाउंडशेनचे अध्यक्ष संतोषकुमार कदम, क्रीडा पत्रकार अजितकुमार संगवी, निवृत्त अधिकारी सतीश घोडके, विरेश नसले, अशोक पाटील, चंद्रकांत पुकाळे, उन्मेश कमलापुरे, कृष्णा कोळी, प्रकाश पाटील,सदानंद सराफ आणि आनंद गायकवाड यांच्यासह खेळाडू आणि नागरिक उपस्थित होते. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा सांगता सोहळानिमित दिनांक ९ ते १५ ऑगस्ट पर्यंत मेरी माटी मेरा देश उपक्रम राबविण्यात येत असून या अंतर्गत पंचप्रण शपथ आणि फोटो बुथचे आयोजन करण्यात आले होते. आम्ही शपथ घेतो की, भारतास 2047 पर्यंत आत्मनिर्भर आणि विकसित राष्ट्र बनविण्याचे स्वप्न साकार करू. गुलामीची मानसिकता मुळापासून नष्ट करू. देशाच्या समृद्ध वारशाचा गौरव करू. भारताची एकात्मता बलशाली करू आणि देशाचे संरक्षण करणाऱ्यांप्रती सन्मान बाळगू. देशाचे नागरिक म्हणून सर्व कर्तव्यांचे पालन करू, अशी शपथ जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी सर्व उपस्थित खेळाडू, मुले आणि नागरिकांना दिली.
मेरी माटी मेरा देश मातीला नमन, वीरांना वंदन देशांच्या वीरांना समर्पित या उपक्रमात सहभागी होण्याकरिता https://yuva.gov.in या वेबसाईटवर नोंदणी करावे तसेच 'पंचप्रण शपथ' याबाबतची छायाचित्रे अपलोड करण्याकरिता https://merimaatimeradesh.gov.
0 Comments