Hot Posts

6/recent/ticker-posts

रोपळे(खुर्द) गावच्या उपसरपंच निवडणुकीनंतर संताजी पाटील गटाने जल्लोष साजरा केला.

 रोपळे(खुर्द) गावच्या उपसरपंच निवडणुकीनंतर संताजी पाटील गटाने  जल्लोष साजरा केला.


माढा (कटूसत्य वृत्त):-
माढा तालुक्यातील दारफळ (सिना)व रोपळे खुर्द या दोन्ही गावचे  उपसरपंच  राष्ट्रवादी काॅग्रेस च्या आमदार बबनराव शिंदे गटाचे झाले आहेत.उपसरपंच पदासाठी  दोन्ही गावात सोमवारी दुपारी  निवडणुक प्रकिया पार पडली.
दारफळ(सिना) गावच्या उपसरपंच पदी जगन्नाथ उर्फ कुमार शिंदे तर रोपळे(खुर्द) गावच्या उपसरपंच पदी सुनंदा गोवर्धन भोसकर यांची निवड झाली.दारफळ ग्रामपंचायत वर आमदार बबनराव शिंदे गटाची एक हाती सत्ता प्रस्थापित झाली असुन लोकनियुक्त  सरपंच पदी अशोक शिंदे यांची निवड झाली होती.एकहाती सत्ता आल्याने उपसरपंच निवडणुक खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.निवडीवेळी राष्ट्रवादीचे पॅनल प्रमुख अशोक लुणावत,सरपंच अशोक शिंदे यांचेसह ग्रामपंचायत सदस्य,गावकामगार तलाठी चैताली चिवटे यांचेसह ग्रामस्थ उपस्थित होते.रोपळे(खुर्द) गावात सरपंच पदी  नागनाथ शिंदे गटाच्या शांताबाई काळे  विजयी झाल्या होत्या.उपसरपंच पदाच्या निवडणुकीत संताजी पाटील गटाने राजकीय कौशल्याचा वापर करुन   सदस्यांचे बहुमत घेत बाजी मारुन उपसरपंच पदाच्या  उमेदवार  सुनंदा गोवर्धन भोसकर या निवडुण आणल्या.निवडीवेळी संताजी पाटील,अंकुश तरटे,शहाजी पाटील,शिदेश्वर पाटील,तुकाराम डोईफोडे,वसंत साळुंखे,दादा डोईफोडे,वसंत मोरे,वैभव साळुंखे,सुधीर चव्हाण आदीसह   ग्रामस्थ उपस्थित होते.निवडीनंतर  जल्लोष साजरा झाला.
Reactions

Post a Comment

0 Comments