मोहोळच्या क्रीडा संकुलाचा आणि बस स्थानकाचा प्रश्न मार्गी लागणार..! - आ. यशवंत माने
मोहोळ (कटूसत्य वृत्त):-उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सत्तेत सहभागी होण्याचा अतिशय धाडसी निर्णय घेतल्यामुळे राज्यासह मोहोळ तालुक्याच्या विकासाला मोठी गती मिळू लागली असून मोहोळ क्रीडा संकुल आणि बसस्थानकासाठी त्वरित म्हणजे सात दिवसाच्या आत प्रस्ताव सादर करावेत अशा सूचना आमदार यशवंत माने यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. मोहोळ येथील पंचायत समिती सभागृहामध्ये आमदार यशवंत माने यांच्या अध्यक्षतेखाली यासंदर्भात अधिकाऱ्यांसमवेत चर्चा आणि बैठक संपन्न झाली आमदार यशवंत माने यांनी गेल्या चार वर्षात मोहोळ विधानसभा मतदारसंघासाठी निधी खेचून आणण्यासाठी फार मोठं यश प्राप्त केलं असून सातत्याने ते मोहोळ मतदार संघाचा विकास करण्यासाठी प्रयत्नशील असल्यामुळेच सध्या अनेक वर्षापासून लांबणीवर पडलेला क्रीडा संकुलाचा विषय मार्गी लागणार आहे. त्याचबरोबर मोहोळ बस स्थानक सुद्धा प्रशस्तपणे उभा राहणार आहे. तसेच पेनुर येथे सर्व एसटी बस यांना थांबा मिळावा अशा सूचना एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना आमदार यशवंत माने यांनी केले आहेत. विकास प्रक्रियेला सध्या उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांची निवड झाल्यानंतर वेग येत असून अनेक योजना पूर्णत्वास जाणार असल्याचे यावेळी बोलताना आमदार यशवंत माने यांनी सांगितले होते.
राज्याचे अर्थमंत्री म्हणून अजित दादा पवार यांनी सूत्रे हातात घेतल्यानंतर राज्याच्या विकासाच्या अनेक योजना मार्गी लागू लागल्या आहेत. देशाचा प्रमुख घटक असणाऱ्या शेतकरी राजासाठी सिंचन योजना मार्गी लावण्यासाठी अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित दादा पवार प्रामुख्याने लक्ष घालत असल्यामुळे विकास आला गती येत आहे. या बैठकीसाठी प्रभारी तहसीलदार भालचंद्र यादव, गटविकास अधिकारी आनंदकुमार मिरगणे , मोहोळ नगरपरिषदेचे मुख्याधिकारी योगेश डोके, राष्ट्रवादी काँग्रेस मोहोळ तालुका अध्यक्ष प्रकाश चवरे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी संचालक भारत सुतकर, जिल्हा परिषदेचे बांधकाम विभाग उपाभियंता तानाजी दळवे, तालुका क्रीडा अधिकारी सुप्रिया गाढवे, महावितरणचे उपअभियंता वनारसे, भूमी अभिलेख चे कांबळे, मंडळ अधिकारी नदाफ, अनिल कादे, अमोल कादे ,नागेश बिराजदार आदी सह अनेक क्षेत्रातील अधिकारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments