धैर्यशील भैया पारंपारिक आटापाट्या खेळण्यात झाले व्यस्त..! सहकाऱ्यांची सोबत लय मस्त...!!
अकलूज (कटूसत्य वृत्त):-सोलापूर जिल्ह्याची राजकीय राजधानी म्हणून आणि आशिया खंडामध्ये नावारूपाला आलेली ग्रामपंचायत म्हणून अकलूज ची ओळख सर्व दूर पसरली असताना याच अकलूजकरांनी पारंपारिक लावणी ला सुद्धा लोक मान्यता मिळवून दिली. मोहिते पाटील बंधू सातत्याने पारंपारिक खेळ आणि लोककला जिवंत ठेवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करताना दिसतात.
अकलूज येथील विजय चौकामध्ये आपल्या सहकारी मित्रांच्या आनंदामध्ये सहभागी होत पारंपारिक आट्यापाट्या खेळाचा आनंद धैर्यशील मोहिते पाटील यांनी घेतला आहे. नुसता फोटोसेशन करण्यापुरताच काहीजण बॅट हातात धरून खेळाडू असल्याचे दाखवतात परंतु धैर्यशील मोहिते पाटील यांनी मात्र आट्यापाट्याच्या मैदानावर उतरून या खेळाचा आनंद स्वतःबरोबरच आपल्या मित्रांनाही देऊन आनंद द्विगुणीत केल्यामुळे आणि आपल्या सहकार्यासमवेत आजही पूर्वीप्रमाणेच एकत्र येऊन खेळाचा आनंद घेतल्यामुळे हेरेशील मोहिते पाटलांच्या या उपक्रमाचं कौतुक होताना दिसत आहे.
0 Comments