Hot Posts

6/recent/ticker-posts

मोदी सरकारने कल्याणकारी योजनांनी उपेक्षित गटांचे सशक्तीकरण केले - चेतनसिंह केदार-सावंत

 मोदी सरकारने कल्याणकारी योजनांनी उपेक्षित गटांचे सशक्तीकरण केले - चेतनसिंह केदार-सावंत


सांगोला  (कटूसत्य वृत्त):- भाजपाने गेल्या नऊ वर्षांत शाश्वत आणि सर्वसमावेशक विकास केला असून देश प्रगतिपथावर घोडदौड करत आहे. देशातील प्रत्येक नागरिकाला समान संधी हे भाजपाच्या समाजकारण आणि राजकारणाचे प्रमुख सूत्र आहे. मोदी युग म्हणजे विकास व मानवतावादाचा अनोखा संगम आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारने केवळ नऊ वर्षांत देशाचा संपूर्ण कायापालट केला. मोदी सरकारने सर्वांगीण विकासाची संस्कृती आणली. विकास आणि कल्याणकारी योजनांनी विविध उपेक्षित गटांचे सशक्तीकरण केले असल्याचे मत भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत यांनी व्यक्त केले.

      पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला ९ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त करमाळा तालुका भाजपच्या वतीने टिफीन बैठक व मन की बात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी भाजपच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी करमाळा तालुकाध्यक्ष गणेश चिवटे, संतोष गायकवाड, संदीपन बानगुडे, सोमनाथ घाडगे, बाळसाहेब कुंभार, अफसर जाधव, दत्तात्रय पोटे, लक्ष्मण केंकन, नितीन झिंझडे, विष्णू रणदिवे, अमोल पवार, भैय्या गोसावी, शांतीलाल वळटे, बापू गणेशकर, संजय बानगुडे, अजिनाथ सुरवसे, हर्षद गाडे, सचिन गायकवाड, दादा पाठक, राजेश पाटील,संदीप काळे, विशाल घाडगे, बापू मोहोळकर, धर्मराज नाळे, विनोद महानवर, बजरंग मोहोळकर यांच्यासह भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

       यावेळी बोलताना भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत म्हणाले, देशाची सूत्रे हाती घेतल्यापासून पंतप्रधान मोदी यांच्या प्रत्येक धोरण आणि कृतीत भारत प्रथम ठेवला आहे. आर्थिक व्यवस्थापन, उपेक्षित समाजाचे सक्षमीकरण, संस्कृतीचे संवर्धन, आव्हानात्मक उद्दिष्टे साध्य करणे हेच पंतप्रधान मोदी यांची मोठी उपलब्धी आहे. देशात डिजिटल क्रांती होत असून देशात जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यात येत आहेत. ग्रामीण भागात विद्युतीकरण आणि प्रत्येक घरात पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे. सामाजिक न्यायासाठी पायाभूत सुविधांची निर्मिती, महिलांचे सक्षमीकरण, तरुणांना संधी, शेतकऱ्याचा उत्कर्ष, गरिबांची सेवा आणि वंचितांचा विकास याकडे मोदी यांनी लक्ष दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारने नऊ वर्षांत देशाचा संपूर्ण कायापालट केला असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

Reactions

Post a Comment

0 Comments