Hot Posts

6/recent/ticker-posts

इंडिया आघाडीचा मोदी सरकारला "चले जाव"चा इशारा..!

 इंडिया आघाडीचा मोदी सरकारला "चले जाव"चा इशारा..!


सोलापूर (कटूसत्य वृत्त):- आपल्या देशावर ब्रिटिशांनी दीडशे वर्ष राज्य केले होते. ब्रिटिशांचा एक छत्री अंमल म्हणून काढण्यासाठी महात्मा गांधी यांनी ब्रिटिशांना चले जाओ चा नारा दिला होता. त्याच धर्तीवर इंडिया आघाडीच्या माध्यमातून मोदी सरकारला चलेजावच्या नारा देण्यात आला आहे. काँग्रेस सह देशातील प्रमुख विरोधी पक्ष या इंडिया आघाडीमध्ये सहभागी होत असून एक सप्टेंबर रोजी देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये या इंडिया आघाडीच्या बैठकीतून हा नारा देण्यात येणार  असल्याचं  सूत्रांनी सांगितले. आगामी लोकसभा निवडणुकीच्या अगोदर वेगाने घोडदौड करणाऱ्या भाजपाला रोखण्यासाठी इंडिया आघाडी भाजपा समोर तगडे आव्हान उभा करणार असल्याचे दिसत आहे. इंडिया आघाडीतील सर्व पक्षांना आपसातील मतभेद बाजूला ठेवून वज्रमुठ आवळून मुकाबला करावा लागेल. जागा वाटपाच्या मुद्द्यावर इंडिया आघाडीमध्ये थोड्याफार प्रमाणात नाराजी उमटेल परंतु ती सर्वांनी एकसंगपणे एकत्र येऊन मोदी सरकारच्या विरोधात लढावं लागेल. इंडिया आघाडी एकसंध राहिल्यास निश्चितपणे भाजपाला पळता भुई थोडी होईल असंही बोलले जात आहे. मुंबई या ठिकाणी होणाऱ्या इंडियाच्या बैठकीमध्ये सर्वपक्षीयांनी समन्वयाची भूमिका ठेवून संयुक्त जाहीरनामा तयार केला पाहिजे. काँग्रेस राष्ट्रवादी आणि ठाकरे गट शिवसेना यांच्यामध्ये सध्या समन्वयाची भूमिका दिसत आहे परंतु येणाऱ्या इतर पक्षांनी सुद्धा अशीच भूमिका ठेवून कोणतीही खटके उडणार नाहीत याची काळजी घेणे गरजेचे असल्याचे बोललं जात आहे. इंडिया आघाडीत जागा वाटपाचा फार्मूला ठरला तरी काँग्रेस,  राष्ट्रवादी आणि ठाकरे गटात  बंडोबांचे पीक येणार नाही याची मात्र सर्व पक्षांनी काळजी घेणे गरजेचे आहे. पक्षासाठी अनेक वर्षापासून निष्ठेने काम करणाऱ्या एखाद्या कार्यकर्त्याला संधी मिळाल्यास इतर पक्षांनी त्यामध्ये बंड न करता त्या कार्यकर्त्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिल्यास इंडिया आघाडी नवा इतिहास नसेल. इंडिया आघाडीचा कस लागणार असला तरी नियोजनबद्धपणे रणनीती असल्यास विजयाची गणित जुळवण सोपं जाणार आहे. सध्या सरकार बद्दल जनतेच्या मनामध्ये तीव्र नाराज आहे आणि तेच प्रश्न घेऊन जनतेच्या दरबारात इंडिया आघाडी उतरल्यास त्याला चांगला प्रतिसाद मिळेल परंतु त्यासाठी सर्वांनी एकत्रपणे लढा दिला पाहिजे.



Reactions

Post a Comment

0 Comments