माऊली शिक्षण संस्थेत रक्षाबंधन निमित्त ‘माझी राखी देशबांधवांसाठी' सोहळा संपन्न
टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):- श्री माऊली शिक्षण प्रसारक व समाजसेवा मंडळ संचलित टेंभुर्णी येथील लक्ष्मी आनंद विद्या मंदिर व ज्युनिअर कॉलेज तसेच सनराईज प्री-प्राइमरी स्कूल यांच्या वतीने 'माझी राखी देशबांधवांसाठी' व राष्ट्रीय क्रीडा दिवस संपन्न झाला.
यावेळी उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते राजमाता जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व मेजर ध्यानचंद सिंग यांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी लष्करी सेवा अधिकारी, आरोग्य सेवक, पोलीस प्रशासन, पत्रकार, परिवहन महामंडळ, समाजसेवक अशा विविध क्षेत्रातील कार्यरत अतिथी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा संपन्न झाला .
२६ऑगस्ट रोजी घेण्यात आलेल्या 'राखी तयार करणे' स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी विविध आकर्षक रंगीत व देश प्रेमावरती संदेश व्यक्त करणाऱ्या राख्या तयार केल्या. त्या स्पर्धेतील विद्यार्थ्यांचाही बक्षीस वितरण सोहळा मान्यवरांच्या शुभहस्ते पार पडला. प्रशालेच्या वतीने सीमेवरती कार्यरत असलेल्या जवानांसाठी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या ५०० हून अधिक राख्या पोस्टाने पाठविण्यात आल्या. त्यासोबतच प्रशालेच्या आवारात असलेल्या वृक्षाला देखील राखी बांधून निसर्गाप्रती आपले प्रेम विद्यार्थीनींनी व्यक्त केले व आपल्या हाताने तयार केलेल्या राख्या या उपस्थित मान्यवरांना बांधून आपला हा रक्षाबंधनाचा सोहळा आनंदाणे साजरा केला. यावेळी चिमुकल्यांच्या या प्रेमाने उपस्थित अतिथी मान्यवर भावूक झाले.
प्रशालेच्या वतीने उपप्राचार्या रेखा सुरवसे यांनी आपल्या मनोगतातून अशा कार्यक्रमंमुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास होतो, देशाबद्दलचे प्रेम व्यक्त होते व विद्यार्थी शिक्षणाबरोबरच उपक्रमशील बनतात असेही मत त्यांनी मांडले. तसेच संस्थेचे अध्यक्ष योगेश बोबडे म्हणाले की, संस्थेच्या वतीने प्रशालेमध्ये विविध उपक्रम राबविण्यात पाठीमागचा हेतू एकच असतो की विद्यार्थ्यांना आपली संस्कृती जतन करून ठेवण्याची प्रेरणा मिळावी ज्ञान, विज्ञान कला क्रीडा इतर क्षेत्रातही आपण आपली उत्तम कामगिरी बजवावी. रक्षाबंधन म्हणजे बहिण व भावामध्ये खूप मोठा प्रेमाचा, आपुलकीचा धागा आहे. व आपल्या देशासाठी झटणाऱ्या कार्यरत असणाऱ्या सर्व देश बांधवांप्रती आपल्या मनामध्ये आदराची भावना निर्माण व्हावी या हेतू पोटी अशा कार्यक्रमाचे नियोजन करण्यात येते.
यावेळी उपस्थित असलेले संस्थेचे अध्यक्ष योगेश बोबडे, सचिवा शिवमती सुरजा बोबडे , मेजर महावीर कंदील, मधुकर लोंढे, हरिदास कदम, शामराव साळुंखे,भारत फरतडे, पो.ना. हरीश भोसले, डॉ. हिलाले साहेब, पवन कोळपे, श्रीमती बंडगर मॅडम, अविनाश सलगर, पत्रकार अनिल जगताप, गणेश चौगुले, परिवहन मंडळाचे सविता चव्हाण, संजय नवले तसेच उपप्राचार्या रेखा सुरवसे, समन्वयक विकास करळे, प्री प्रायमरी इन्चार्ज सोनम काळे, सागर खुळे व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0 Comments