निर्भय प्रतिष्ठानच्या वतीने जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक गौरव पुरस्काराचे होणार वितरण...! - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, August 10, 2023

निर्भय प्रतिष्ठानच्या वतीने जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक गौरव पुरस्काराचे होणार वितरण...!

 निर्भय प्रतिष्ठानच्या वतीने जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक गौरव पुरस्काराचे होणार वितरण...!

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- 5 सप्टेंबर हा शिक्षक दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो याच शिक्षक दिनाचे औचित्य साधून सोलापूर जिल्ह्यातील प्राथमिक,  माध्यमिक,  जिल्हा परिषद,  नगरपालिका,  महानगरपालिका,  आश्रम शाळा, खाजगी शाळा यामध्ये प्रामाणिकपणे ज्ञानदानाचे पवित्र कार्य करणाऱ्या शिक्षकांना कामांमध्ये गती मिळावी त्याचबरोबर त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप मिळावी या स्वच्छ आणि प्रामाणिक विचारधारेतून जिल्ह्यातील गुणवंत किर्तीवंत यशवंत शिक्षकांना निर्भय प्रतिष्ठान ट्रस्ट मुंबई सोलापूर विभागाच्या वतीने 10 सप्टेंबर 2023 रोजी सोलापुरातील हिराचंद नेमचंद वाचनालय येथील अँपीथिएटर मध्ये मान्यवरांच्या शुभहस्ते जिल्हास्तरीय पुरस्काराने गौरवण्यात येणार असल्याची माहिती श्रमिक पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत विभाग प्रमुख इकबाल बागमारू यांनी दिली.
श्रमिक पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना पुढे बागमारू म्हणाले की, शिक्षक हा समाजाचा आरसा असल्यामुळे त्याला समाज एका वेगळ्या दृष्टीतून पाहतो त्यामुळे त्याच्या पाठीवर शाबासकीची थाप देणं आपलं कर्तव्य आहे.हीच विचार जरा ठेवून आम्ही यावर्षीपासून प्रतिष्ठानच्या वतीने शिक्षकांना पुरस्कार प्रदान करणार आहोत. या पुरस्काराचे स्वरूप मानाचा फेटा, शाल,  सन्मानचिन्ह पुष्पगुच्छ आणि प्रमाणपत्र असे असून पात्र शिक्षकांनी आपला प्रस्ताव ऑनलाइन किंवा व्हाट्सअप पीडीएफ द्वारे दिनांक 22 ऑगस्ट पर्यंत या क्रमांकावर 9823366445  , 9975676837 पाठवावेत असे आवाहन यावेळी विभाग प्रमुख इकबाल बागमारू, आणि कोषाध्यक्ष अशोक हत्ते यांनी केले आहे. तरी या पुरस्काराचा जिल्ह्यातील अनेक शिक्षकांनी लाभ घ्यावा असे आवाहन शेवटी करण्यात आले. या पत्रकार परिषदेला जिल्हा अध्यक्ष वशिष्ठ सोनकांबळे, सचिव जब्बार शिकलगार, कार्याध्यक्ष करीम आहेरवाडी आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages