१८ व्या वर्धापन दिनानिमित्त सोनी महाविद्यालयात १०१ रक्तदात्याचे रक्तदान - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, August 21, 2023

१८ व्या वर्धापन दिनानिमित्त सोनी महाविद्यालयात १०१ रक्तदात्याचे रक्तदान

 १८ व्या वर्धापन दिनानिमित्त सोनी महाविद्यालयात १०१ रक्तदात्याचे रक्तदान


 सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सैफुल येथील देशभक्त हरिनारायण बंकटलाल सोनी महाविद्यालयात महाविद्यालयाच्या १८ व्या वर्धापन दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

 माहेश्वरी विद्या प्रचारक मंडळ, पुणे व एम. व्ही. पी. एम. छात्रालय विद्यार्थी संघटना तसेच डी.एच.बी. सोनी महाविद्यालय व डॉ. हेडगेवार ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबिरांचे उद्घाटन प्रमुख पाहुणे महाविद्यालयाचे सदस्य डॉ. गिरीश हरकुट  यांच्या हस्ते करण्यात आले.

उद्घाटन प्रसंगी बोलताना मा. सदस्य डॉ. गिरीशजी हरकुट म्हणाले, रक्तदानाच्या माध्यमातून आपण खऱ्या अर्थाने एखाद्यास जीवनदान देऊ शकतो. त्यासाठी नागरिकांनी स्वच्छेने  पुढाकार घेऊन ही सामाजिक बांधिलकी जोपासली पाहिजे. रक्तदान केल्यामुळे होणारे फायदे ,रक्तदान कोणत्या व्यक्ती करू शकतात तसेच समाजातील प्रत्येक नागरिकांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.  स्वतःचे आरोग्य उत्तम राखून व विविध सामाजिक तसेच राष्ट्रीय मूल्यांची  जोपासना करून संपूर्ण देशाला सशक्त बनवण्याची जबाबदारी ही प्रत्येक नागरिकांची आहे असे मत त्यांनी व्यक्त केले.

 या रक्तदान शिबिरामध्ये सोलापूर शहरातील व विजापूर रोड परिसरातील नागरिक, कॉलेजचे शिक्षक वर्ग, विद्यार्थी. विद्यार्थ्यांचे पालक, आजी-माजी विद्यार्थी अशा एकूण १०१ रक्तदात्यांनी आपला सहभाग नोंदविला. तसेच रक्तदान शिबिराचे औचित्य साधून विद्यार्थ्यांना इंडियन मेडिकल असोसिएशन सोलापूरच्या सदस्या तसेच रोटरी क्लबचे अध्यक्षा डॉ. शिल्पा कुलकर्णी यांनी थॅलेसेमिया या विषयावर महत्वपूर्ण माहिती  सर्व विद्यार्थ्यांना व उपस्थितांना दिली.

 या कार्यक्रमाचे पूर्ण आयोजन महाविद्यालयाचे सह-सचिव रिजनल डायरेक्टर  एम. व्ही. पी. एम. ॲल्युमनी, सोलापूर चाप्टरचे मधुसूदन करवा यांनी केले.

 या कार्यक्रमासाठी गिरधारी  भुतडा - उपाध्यक्ष  एम. व्ही. पी. एम. , पुणे,  ओमप्रकाश सोमाणी  - कार्यकारणी सदस्य,  एम. व्ही. पी. एम. , पुणे तसेच एम. व्ही. पी. एम. ॲल्युमनी सदस्य मनोज मर्दा, प्रशांत भुतडा, गोकुळ  भुतडा  तसेच सोनी महाविद्यालयाचे पदाधिकारी वर्ग व इंडियन मेडिकल असोसिएशनचे  अध्यक्ष डॉ. केदार कहाते, सदस्या डॉ. शिल्पा कुलकर्णी, सोनी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. आशा रोकडे, संचालिका डॉ. वासंती अय्यर, उपप्राचार्या हरदीपकौर  बोमरा, शिक्षक व शिक्षकेत्तर  प्रतिनिधी इ. सर्वजण उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages