Hot Posts

6/recent/ticker-posts

व्ही. व्ही. पी पॉलिटेक्निक सोलापूर येथे इंडक्शन प्रोग्राम संपन्न

 व्ही. व्ही. पी पॉलिटेक्निक सोलापूर येथे इंडक्शन प्रोग्राम संपन्न


सोलापूर (कटुसत्य वृत्त): सोरेगाव येथील विद्या विकास प्रतिष्ठान पॉलिटेक्निक सोलापूर येथे प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांसाठी इंडक्शन प्रोग्रामचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे अध्यक्ष प्रा. डॉ. जी. के. देशमुख आणि सचिव श्री. अमोल (नाना) चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली प्राचार्य एस. एम‌. शेख यांनी केले‌ कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्रथम वर्ष विभाग प्रमुख डॉ. साईकृष्ण चव्हाण यांनी प्रास्ताविक मांडून सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत केले. त्यानंतर प्राचार्य प्राध्यापक यांनी सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना इंडक्शन प्रोग्रामचे महत्व विशद केले व यंदाच्या वर्षापासून सुरू होत असलेल्या एम एस बी टी इ बोर्डाच्या के स्कीम अभ्यासक्रमाची ओळख विद्यार्थ्यांना करून दिली‌. वर्षभरामध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी करण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या उपक्रमाची माहितीही यावेळी प्रा. शेख यांनी विद्यार्थ्यांना दिली‌. पाच दिवस चाललेल्या या कार्यक्रमांमध्ये वेगवेगळ्या विषय तज्ञांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले. यामध्ये इम्पॉर्टन्स ऑफ पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट इन लाइफ ऑफ इंजीनियर या विषयावर प्रा. डॉ. साईकृष्ण चव्हाण, डिप्लोमा इंजिनियर ट्रेनिंग अँड प्लेसमेंट या विषयावर प्रा. रोहन कुरी, ब्रांच वाईज आफ्टर डिप्लोमा या विषयावर प्रा. ए एच ए आर शेख, शिक्षणातील आय सी टी चे महत्व या विषयावर प्रा. रेखा बिरादार, नीड अँड इम्पॉर्टन्स ऑफ कम्युनिकेशन स्किल या विषयावर प्रा. देविदास कोळी, इम्पॉर्टन्स ऑफ सायन्स यावर प्रा. मीना चडचण, क्विझ आणि पझल्सवर प्रा. रोहित बिराजदार, वैदिक मॅथ्स या विषयावर प्रा. सत्यशीला वामन तर योगा आणि मेडिटेशन या विषयावर सौ. मीरा कोंडुभैर्य तर आउट कम बेस्ड एज्युकेशन या विषयावर प्रा‌. मनोज ढोबळे यांचे मार्गदर्शन लाभले.
Reactions

Post a Comment

0 Comments