स्मृती ऑरगॅनिक लिमिटेड तर्फे नेताजी शाळेला दहा संगणक भेट - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, August 21, 2023

स्मृती ऑरगॅनिक लिमिटेड तर्फे नेताजी शाळेला दहा संगणक भेट

 स्मृती ऑरगॅनिक लिमिटेड तर्फे नेताजी शाळेला दहा संगणक भेट

सोलापूर  (कटूसत्य वृत्त):-नीलम नगर येथील नेताजी सुभाषचंद्र बोस इंग्लिश मिडीयम स्कूलला स्मृती ऑरगॅनिक लिमिटेड तर्फे दहा संगणक भेट देण्यात आले. स्मृती ऑरगॅनिक लिमिटेडचे उपाध्यक्ष रफिक शेख यांच्या हस्ते संगणक कक्षाचे उदघाटन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थापक अध्यक्ष अण्णाराव कुंभार होते.यावेळी व्यासपीठावर स्मृती ऑरगॅनिक लिमिटेडचे पदाधिकारी कमलाकर गज्जम, कार्तिक गुंडेली, सेवानिवृत्त मुख्याध्यापक विजयकुमार हुल्ले, मुख्याध्यापक रविशंकर कुंभार, मुख्याध्यापिका वैशाली कुंभार, मुख्याध्यापिका विजयालक्ष्मी कुंभार आदी उपस्थित होते.यावेळी रफिक शेख म्हणाले स्मृती ऑरगॅनिक लिमिटेड कंपनीचे समाज संगणक साक्षर करण्याचे स्वप्न असून गरीब मुलांना संगणकाचे परिपूर्ण ज्ञान मिळण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे सांगितले. संस्थापक अध्यक्ष अण्णाराव कुंभार म्हणाले,स्मृती ऑरगॅनिक लिमिटेड कंपनीचे संगणक साक्षरता हे उपक्रम स्तुत्य असून शाळेतील विद्यार्थ्यांनी व पालकांनी पुरेपूर लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन....... यांनी केले तर ..... यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages