अखिल भारतीय मजदूर सेवा संघाच्या पुढाकारातून 6 नंबर झोनमधील ड्रेनेजचे काम लागले मार्गी..! - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, August 22, 2023

अखिल भारतीय मजदूर सेवा संघाच्या पुढाकारातून 6 नंबर झोनमधील ड्रेनेजचे काम लागले मार्गी..!

 अखिल भारतीय मजदूर सेवा संघाच्या पुढाकारातून 6 नंबर झोनमधील ड्रेनेजचे काम लागले मार्गी..!

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सध्या सोलापूर शहरांमध्ये ड्रेनेज लाईन आणि पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर बनत चाललेली आहे. ड्रेनेज लाईन फुटल्यामुळे नागरिकांना आजाराला तोंड द्यावे लागत आहे. अनेक सर्वसामान्य नागरिक उपचार सुद्धा घेत आहेत. त्यामुळे या भागातील लोकप्रतिनिधींना या समस्येचे महत्त्व पटवून देण्यामध्ये अखिल भारतीय मजदूर सेवा संघाच्या जिल्हाध्यक्ष विद्याताई माने ,श्रीदेवी जाधव  आणि या प्रभागातील नागरिकांना यश आला असून या प्रभागाच्या नगरसेविका सुनीता रोटे यांनी तात्काळ या प्रश्नाकडे लक्ष देऊन ताबडतोब महापालिका आयुक्त शितल तेली उगले यांना या संदर्भात पत्र पाठवून ही समस्या सोडवल्यामुळे त्यांच्यावर कौतुकाचा वर्षा होत आहे.
सविस्तर वृत्त: - सोलापूर शहरातील सलगर वस्ती परिसरातील सहा पाईप ब्लॉक झाल्यामुळे त्या परिसरामध्ये घाणीचे साम्राज्य पसरल्यामुळे अनेक साथीचे रोग पसरू लागले होते. काही नागरिक हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असल्याचं दिसून आल्यानंतर या भागाच्या रणरागिणी विद्याताई माने यांनी या प्रश्नाकडे लक्ष दिले. आणि या ठिकाणी 18 इंच पाईप लाईन टाकून ती पाईप ओढ्याला जोडण्याची विनंती प्रशासनाला करण्यात आली. तसेच निर्मिती विहार शेजारील मोरया गणपती जवळील ड्रेनेची समस्या खूप मोठी असून पाऊस पडल्यानंतर पावसाचे पाणी या भागातील नागरिकांच्या घरात जाते आणि घराला तळ्याचे स्वरूप प्राप्त होते. ही सुद्धा समस्या सोडवण्यासाठी मेन रोड पर्यंत अठरा इंच पाईपलाईन टाकण्याचे आवाहन प्रशासनाला करण्यात आले. आदित्य नगर आणि आंबेडकर चौकातील पाणी टाकी जवळील मेन रोड पर्यंत ड्रेनेज लाईन नाही ते ड्रेनेज लाईनचे काम सुद्धा झाले पाहिजे अशी मागणी यावेळी नगरसेविकास सुनिता रोटे यांच्या माध्यमातून करण्यात आल्यामुळे या जागृत नागरिकांचे आणि विशेषता अखिल भारतीय मजदूर सेवा संघाच्या जिल्हाध्यक्ष विद्याताई माने यांचे या प्रभागातून कौतुक होत आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages