एकात्मिक फलोत्पादन विकास कार्यक्रम सन 2023-24 चा शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, August 25, 2023

एकात्मिक फलोत्पादन विकास कार्यक्रम सन 2023-24 चा शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन

 एकात्मिक फलोत्पादन विकास कार्यक्रम सन 2023-24 चा शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन


सोलापूर (कटूसत्य वृत्त):- एकात्मिक फलोत्पादन विकास कार्यक्रम या योजनेसाठी जिल्हयास रक्कम रू.1486.31 लाख कार्यक्रम राबविण्यास मान्यता प्राप्त झाले आहे.  ह्या योजनेतील घटक –ड्रॅगन फ्रुट, ॲवोकॅडो, सुट्री फुले मसाला पिके, फळबाग पुनरूज्जीवन , सामुहिक शेततळे अस्तरीकरण ,शेडनेट हाऊस, हरितगृह, प्लास्टिक मल्चिंग,डाळिंब पिकासाठी अँन्टी हेलनेट कव्हर , मधुमक्षिका वसाहत व मधुमक्षिका संच , ट्रॅक्टर 20एचपी पर्यंत , पॉवर टिलर 8 एचपी पेक्षा जास्त व कमी, पिक संरक्षण उपकरणे ,पॅक हाऊस, पुर्व शीतकरण गृह , शीत खोली, शीतगृह, रेफर व्हॅन,रापनिंग चेंबर प्राथमिक प्रक्रिया केंद्र , एकात्मिक शीतसाखळी, कांदाचाळ स्थाई / फिरते विक्री केंद्र –शीत चेंबरच्या सुविधासह , द्राक्ष पिकासाठी  प्लास्टिक कव्हर व भाजीपाला रोपवाटीका घटकांचा समावेश आहे.

      लाभार्थीं निवडीचे निकष पुढील प्रमाणे –

लाभार्थी शेतकऱ्यांच्या नावे स्वत:ची शेत जमिन असणे आवश्यक आहे. शेतकऱ्याकडे फलोत्पादन पिके असणे आवश्यक राहील.

     तरी जिल्हायातील सर्वसाधारण , अनुसुचित जाती व अनुसुचित जमाती,  व इतर सर्व प्रवर्गातील शेतकऱ्यांना आवाहन करण्यात येते की, वरील प्रमाणे घटकासाठी अधिकाअधिक शेतकऱ्यांनी महा-डीबीटी पोर्टल http://mahadbtmahait.gov.in या संकेत स्थळावर अर्ज करावेत. अधिक माहितीसाठी संबधीत नजीकच्या कृषी कार्यालयाशी  संपर्क साधवा. असे आवाहन  जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages