Ads

Ads Area

अर्धापूर तहसिल कार्यालयासमोर व्हाॅईस ऑफ मिडीयाचे धरणे आंदोलन

 अर्धापूर तहसिल कार्यालयासमोर व्हाॅईस ऑफ मिडीयाचे धरणे आंदोलन


    ● पत्रकारांच्या विविध मागण्यासाठी केले आंदोलन

    ● विविध राजकीय पक्षांचा पाठींबा

नांदेड (कटूसत्य वृत्त):- राज्यातील सर्वच पत्रकारांच्या विविध मागण्या मंजूर करून घेण्यासाठी व्हॉईस ऑफ मीडियाचे संस्थापकीय अध्यक्ष संदीप काळे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रात दि. ११ मे रोजी राज्यव्यापी धरणे आंदोलन करण्यात आले होते. या पार्श्‍वभूमीवर अर्धापूर येथे व्हॉइस ऑफ मीडिया तालुका शाखेच्या वतीने तहसिल कार्यालयासमोर एक दिवसाचे धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला विविध राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पाठींबा दर्शविला आहे.


        व्हाॅईस ऑफ मिडियाच्या वतीने पत्रकारांसाठी स्वतंत्र कल्याणकारी महामंडळ स्थापन करून त्याला भरीव निधी द्यावा, पत्रकारितेत पाच वर्ष पूर्ण केलेल्या पत्रकारांना सरसकट अधिस्वीकृती पत्रिका देण्यात यावी, वृत्तपत्रांना सध्या जाहिरातीवर लागू असलेला जी.एस.टी. रद्द करावा, पत्रकारांच्या घरांसाठी विशेष बाब म्हणून शासकीय भूखंड देण्याचा निर्णय घ्यावा, कोरोनात जीव गमावलेला पत्रकारांना फ्रंट लाईन वर्करचा दर्जा देऊन त्यानुसार मयत पत्रकारांच्या कुटुंबांचे पुनर्वसन करावे. अशा अनेक पत्रकारांच्या हिताच्या मागण्या मंजूर करण्यासाठी अर्धापूर तहसिल कार्यालयासमोर गुरुवारी धरणे आंदोलन करण्यात आले.


         या आंदोलनीत व्हाॅईस ऑफ मिडिया अर्धापूर तालुकाध्यक्ष गोविंद टेकाळे, पत्रकार नागोराव भांगे पाटील, रामराव भालेराव, शेख साबेर, छगन पाटील इंगळे, युनूस नदाफ पार्डीकर, दिगंबर मोळके, इरफान पठाण, शेख जुब्बेर, अनिल मोळके, सय्यद युनूस आदी पत्रकारांनी आपल्या मागण्यांचे लेखी निवेदन तहसिलदार उज्ज्वला पांगारकर यांना दिले. या दरम्यान काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, बी.आर. एस पक्ष, आम आदमी, प्रहार जनशक्ती पार्टी, वंचित बहुजन आघाडी आदी राजकीय पक्षातील प्रमुख पदाधिकारी यांनी आंदोलन स्थळी भेट देऊन पत्रकारांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला.


       यावेळी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस संजय देशमुख लहानकर, राष्ट्रवादी जिल्हा चिटणीस ॲड. सचिन देशमुख, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष हनुमंतराव पाटील राजेगोरे, दिपक मगर, भाजपचे तालुका अध्यक्ष बालाजी स्वामी अवधूतराव पाटील कदम, आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर कदम, माजी सरपंच शंकरराव टेकाळे,आकाश सूर्यवंशी,सरपंच अमोल डोंगरे, प्रहारचे तालुका अध्यक्ष छगन पाटील सांगोळे, ओमप्रकाश पत्रे, एस.क्षिरसागर, शंकरराव ढगे, संदीप राऊत , राजेश्वर देशमुख, अजित गठ्ठाणी, बी.आर.एस पक्षाचे जिल्हाध्यक्ष शेख मकसुद, संदीप आबादार आदी पदाधिकाऱ्यांनी पत्रकारांची भेट घेऊन आंदोलनाला पाठींबा दिला आहे.

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad

close