Ads

Ads Area

स्वातंत्र्य सेनानी संदिपान दादा गायकवाड यांनी दिलेले देशभक्तीचे विचार समाजाला दिशादर्शक - माजी आमदार राजन पाटील

 स्वातंत्र्य सेनानी संदिपान दादा गायकवाड यांनी दिलेले देशभक्तीचे विचार समाजाला दिशादर्शक - माजी आमदार राजन पाटील


मोहोळ (कटूसत्य वृत्त):- स्वातंत्र्य सेनानी संदिपान दादा गायकवाड यांनी दिलेले देशभक्तीचे विचार समाजाला दिशादर्शक असल्याचे परखड मत माजी आमदार राजन पाटील यांनी व्यक्त केले.
श्री संदिपान दादा गायकवाड सामाजिक सांस्कृतिक शारीरिक कला व क्रीडा कार्यकारी संस्था, मोहोळ जि.सोलापूर, साप्ताहिक कृष्णलीला व समृद्धी प्रकाशन सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्यसेनानी संदिपान दादा गायकवाड यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित केलेल्या 2023 राष्ट्रीय सामाजिक कला, साहित्य संमेलन व विविध घटकांतील व्यक्तींना पुरस्काराने गौरविण्यात आलेल्या कार्यक्रमाप्रसंगी  माजी आमदार राजन पाटील बोलत होते.
 माजी आमदार राजन पाटील पुढे बोलताना म्हणाले कि, संदिपान दादा आणि आमच्या घराण्याचा जवळीक संबंध गेल्या पन्नास वर्षापासूनचे आहेत. ज्यावेळेस मी लहान असताना मोहोळ येथे यायचो त्यावेळी माझे वडील (कै.लोकनेते बाबुराव अण्णा पाटील) मला संदिपान दादा यांच्या जवळ बसवून जायचे त्याचवेळी मला संदिपान दादा यांच्या विचाराचे बाळकडू जवळून घेता आले. समाजातील रंजल्या गांजलेल्यांना जवळ करण्याचे आणि त्यांच्यामध्ये आत्मसन्मान आणि आत्मविश्वास निर्माण करण्याचं काम सुद्धा संदिपान दादांनी अतिशय प्रामाणिकपणे केलं. आणि म्हणूनच आज त्यांची मुलं विशेषतः डॉ.कौशिक गायकवाड त्यांच्या नावाने समाजातील विविध क्षेत्रांमध्ये आपल्या कामाचा ठसा उमटवणाऱ्या व्यक्तींना गौरवपूर्वक पुरस्कार देऊन सन्मान केला जात आहे हे खऱ्या अर्थाने कौतुकास्पद आणि आनंददायी गोष्ट आहे.


संदिपान दादांचे विचार पुढे नेण्यासाठी बहुउद्देशीय व संशोधन संस्थेचे संस्थापक डॉक्टर कौशिक गायकवाड अतिशय जोमाने काम करत असल्यामुळेच सध्या ही संस्था सुद्धा राष्ट्रीय कार्याला वाहून घेत असल्याचे दिसत आहे. तर मोहोळ तालुक्यात खऱ्याअर्थाने सामाजिक कार्यात अग्रेसर असलेली एकमेव सामाजिक संस्था आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. अशा प्रकारचे पुरस्कार दिल्यामुळे काम करणाऱ्या माणसांमध्ये आत्मविश्वास आणि चेतनाशक्ती वाढते त्यामुळे या पुरस्काराचे महत्त्व शब्दांमध्ये सांगण्याच्या पलीकडे असल्याचं राजन पाटील यांनी शेवटी सांगितलं.
याप्रसंगी बोलताना सु्प्रासिध्द अभिनेत्री किशोरीताई अंबिये म्हणाल्या कि, या पुरस्कारामुळे ग्रामीण भागातील होतकरू कलाकारांच्या कलेला मोठा वाव मिळणार असून येणाऱ्या काळात निश्चतपणे या पुरस्काराच्या माध्यमातून त्यांच्या कलागुणांना चांगलेच प्रोत्साहन मिळणार आहे. राज्यातील कानाकोपऱ्यातून आलेल्या यशस्वीतांचा गैरव माझ्या हातून होत आहे हे माझे भाग्य समजते.
 याप्रसंगी बोलताना आमदार यशवंत माने म्हणाले की, माजी आमदार राजन पाटील यांनी तालुक्यासह जिल्ह्यातील अनेक युवकांना रोजगार मिळवून देण्याचे काम केले आहे. राष्ट्रीयकृत बँकेने युवकांना उद्योग धंदा उभा करण्यासाठी कर्ज नाकारलेल्या युवकांना कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी मोहोळ नागरी पतसंस्था स्थापन करून कर्ज उपलब्ध करून देऊन अनेक सुशिक्षित बेकार युवकांची कुटुंब उभारण्याचे काम माजी आमदार राजन पाटील यांनी केले आहे. स्वातंत्र्य सेनानी संदिपान दादा गायकवाड यांच्या सारख्या महान व्यक्तींच्या सहवासात राहिल्याने राष्ट्रहिताचे विचार माजी आमदार राजन पाटील व डॉक्टर कौशिक गायकवाड यांच्या मनात रुजले असल्यानेच त्यांच्या हातून असे सामाजिक कार्य घडत असल्याचं आ.माने यांनी शेवटी सांगितलं.
प्रास्ताविक करताना श्री संदिपान दादा गायकवाड बहुउद्देशीय व संशोधन संस्थेचे संस्थापक डॉ. कौशिक गायकवाड म्हणाले कि, सतत कोणत्याही फळाची अपेक्षा न करता निस्वार्थपने कार्य करीत राहणे म्हणजे जीवनाचा खरा अर्थ असतो विशेष म्हणजे दुसऱ्यासाठी जगत असताना स्वतः साठी प्रेरणा मिळावी या उद्देशाने आम्ही या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले आहे.
स्वातंत्र्यसेनानी संदिपान दादा गायकवाड सभागृह, सोलापूर रोड मोहोळ जिल्हा सोलापूर येथे नुकत्याच झालेल्या संमेलनाचे अध्यक्ष माजी आमदार राजन पाटील, कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार यशवंतराव माने तर प्रमुख पाहुणे म्हणून सु्प्रासिध्द अभिनेत्री किशोरीताई अंबिये या होत्या. विचारपीठावर प्रगतशील बागायतदार सुग्रीव व्यवहारे, शिवाजीराव गणपाटील, तुकाराम डुबल, उद्योगपती वसंतराव मालू जकर-पाटील, अरुण सोकांडे-पाटील, सोलापूर जिल्हा नागरी बँक असोसिएशन संचालिका संगीता फाटे व वृत्तदर्पण न्यूज चॅनल प्रमुख पांडुरंग सुरवसे यांच्या प्रमुख उपस्थितीत होते.
समृद्धी प्रकाशन सिंधुदुर्गचे समन्वयक व प्रमुख डॉ.बाळकृष्ण खरात यांनी आभार व्यक्त करताना विविध क्षेत्रातील उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करून मनस्वी आनंद झाला आहे.
                  यावेळी उपनगराध्यक्ष प्रमोद डोके, माजी नगरसेवक मुस्ताक शेख,चेअरमन राजू खपाले, उद्योजक रघुनाथ भोसले, उत्कृष्ट वक्ते महेश पवार, उद्योजक वैभव गुंड,जयवंत गुंड, भीमा सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक शिवाजी चव्हाण, चन्द्रकांत वाघमोडे, काका भोसले, भाऊसाहेब गायकवाड, श्रीकांत गायकवाड, अभिजित गायकवाड, प्रतिक गायकवाड, जगन्नाथ कोल्हाळ, राम कदम, सौ.शुभांगी लंबे, राष्ट्रवादी काँग्रेस महिला अध्यक्षा यशोदा कांबळे, युवा नेते दयानंद राऊत आदी मान्यवर उपस्थित होते.
दरवर्षी प्रमाणे दिला जाणारा स्वातंत्र्यसेनानी संदिपान दादा गायकवाड कृषि पुरस्कार वडवळ येथील प्रगतशील व प्रयोगशील शेतकरी राहूल भाऊसाहेब मोरे यांना देबून सन्मानित करण्यात आले.
तसेच हरि ओम मित्र मंडळ, मोहोळ, सामाजिक सेवा, सनराईज क्लब, मोहोळ, सामाजिक सेवा, सौ. मंगल अरुण सोकांडे-पाटील, पुणे, शिक्षण सेवा, माळी बचत गट, अनगर, उद्योग सेवा, फोटोग्राफर असोसिएशन, मोहोळ, व्यवसाय सेवा, 71 फाऊंडेशन, मोहोळ, सामाजिक सेवा, हिरकणी महिला मंडळ, मोहोळ, सामाजिक सेवा, जगदंबा शेतकरी बचत गट, पोखरापूर, उद्योग व सेवा, श्री भवानी महाराज शिक्षण संस्था, मोहोळ, शिक्षण सेवा, श्री. सचिन मोहन जाधव, कटुसत्य, सोलापूर, पत्रकारीता, श्री. प्रथमेश राजेश खपाले, मोहोळ, उद्योग, श्री. संतोष बळीराम ननवरे, इंदापूर, पत्रकारीता, कु. सरिता संभाजी भोसले, मंगळवेढा, शिक्षण, कु. अर्चना एच. कदम, मंगळवेढा, शिक्षण, श्री. राजकुमार श्रीधर पवार, मंगळवेढा, शिक्षण, डॉ. जावेद चाँदसाहेब तांबोळी, मंगळवेढा, शिक्षण, डॉ. राजाराम महादेव पवार, मंगळवेढा, शिक्षण, सौ. साधना सुरेश घाटगे, मोहोळ, साहित्य, श्री. सचिन सुरेश देशमाने, मोहोळ, उद्योग, प्रा. डॉ. तानाजी रावसाहेब मगर, मंगळवेढा, शिक्षण, सौ. कांता मच्छिंद्र गुंड, समाजसेवा, सौ. यशोदा दिलीप कांबळे, मोहोळ, समाजसेवा, श्री. शिवाजी लक्ष्मण पासले, मोहोळ, कृषि, श्री. प्रमोद मोहन डोके, मोहोळ, उद्योग व सामाजिक सेवा, श्री. विष्णू रामदास थिटे, माहोळ, उद्योग, श्री. भारत किसन बोबडे, मोहोळ, उद्योग, कु. अनुष्का अमोल गायकवाड, 5 वी, मोहोळ, अध्ययन / शिक्षण, विशेष प्राविण्य, श्रीमती फातिमा पाटावाला, अकलुज, उद्योग व सेवा, श्री. बबनराव शामराव शेळके, कार्यकारी संचालक, एसीपीएल, सातारा, उद्योग व सेवा, श्री. प्रशांत बाबुराव माने, सामाजिक सेवा, श्री. भैरवनाथ श्रीपती पवार, उज्वला दत्तात्रय देवकर, अकलूज, भारत श्री सामाजिक व शैक्षणिक सन्मान, डॉ. राजकुमार पांडुरंग घारे, सातारा भारत प्रतिमा शैक्षणिक सेवाभूषण पुरस्कार, श्री चंद्रकांत महादेव डुबल, सातारा, भारत श्री कलारत्न पुरस्कार, श्री विजय अशोक परीट, सांगली भारत प्रतिमा समाजभूषण सन्मान, श्री संदीप राक्षे, पुणे, भारत श्री सन्मान 2023 सौ. रजनीताई शिंदे, अध्यक्षा वेध फाउंडेशन इचलकरंजी, भारत श्री समाजभूषण सन्मान युवराज बळीराम मोरे, कोल्हापूर भारत प्रतिमा समाजभूषण सन्मान, अनिल वसंतराव वेदपाठक, पुणे भारत श्री समाजभूषण सन्मान डा. चंद्रकांत तुकाराम सावंत, सिंधुदुर्ग भारत श्री शैक्षणिक सन्मान, श्रीमती माधुरी सतीश सुदा, अमरावती भारत श्री सन्मान, डॉ. सुमैय्यापरवीन जाहागीरदार, सोलापूर- राष्ट्रीय मा ँ..तुझे सलाम शैक्षणिक रत्न सन्मान, श्रीमती कामाक्षी कल्याणराव पवार, लातूर भारत श्री सामाजिक शैक्षणिक सन्मान, प्रा. रामलिंग लक्ष्मण सावळजकर, सोलापूर - भारत श्री शैक्षणिक सेवा सन्मान, प्रा. अरविंद कृष्णा मानकर, कोल्हापूर भारत प्रतिमा समाजभूषण सन्मान, श्री संजय पवार,संस्थापक अध्यक्ष अविष्कार फाउंडेशन, कोल्हापूर सोशल युथ नॅशनल आयकॉन सन्मान, श्रीमती माधुरी सुभाष मन्द्रे, पुणे भारत श्री सामाजिक व शैक्षणिक सेवा सन्मान, गणेश अमृतकर महाकाली ग्रुप जळगाव, भारत श्री समाजभूषण सन्मान, अविनाश मारुती अडसूळ, पुणे महाराष्ट्र लोक समाजभूषण सन्मान, दीपक पोपट चव्हाण, सोलापूर सोशल युथ आयकॉन अवॉर्ड, मैनोदीन महताब शेख, लातूर भारत श्री शैक्षणिक सेवा रत्न सन्मान, श्री नूर अहमद बशीर कारंजे, सोलापूर भारत प्रतिमा समाजभूषण सन्मान, कृष्णकुमार भगवानराव दडके, परभणी भारत प्रतिमा शैक्षणिक सन्मान, प्रा. नागेश जनार्धनराव कान्हेकर देशमुख, परभणी भारत श्री क्रीडा रत्न राष्ट्रीय सन्मान, प्रा.डा.राजेंद्र पांडुरंगराव तुप्पेकर, परभणी भारत श्री शिक्षण राष्ट्रीय पुरस्कार, शुभांगी तुकाराम लंबे, सोलापूर भारत श्री समाजभूषण सन्मान, प्रा. डा. नागन्नाथ दत्तात्रय घोरपडे, सोलापूर, भारत श्री शैक्षणिक सन्मान, सुहास गोडसे, पुणे मातृसेवा फाउंडेशन, पुणे भारत श्री समाजभूषण सन्मान, संस्कृती सुहास गोडसे, भारत श्री सन्मान, सरिता पराग धर्मे, सोलापूर भारत श्री सन्मान, अतुल नाना बोराटे, पुणे भारत श्री पत्रकारिता सन्मान, श्री सुशांत सुनील दरेकर पुणे भारत प्रतिमा समाजभूषण सन्मान, डॉ. इंद्रजीत यादव, पुणे भारत श्री समाजभूषण सन्मान, डॉ.सत्येंद्र संगाप्पा राऊत, उस्मानाबाद भारत श्री शैक्षणिक सन्मान, जिब्राईल शेख ७१ फाउंडेशन, मोहोळ महाराष्ट्र श्री समाजभूषण सन्मान, सौ. मनीषा सुनील घेवडे, मुंबई महाराष्ट्र लोक भूषण सन्मान, शशिकांत भीमराव साळुंखे, सातारा भारत श्री शिक्षण रत्न सन्मान, सरिता संजय कदम, कुर्ला भारत श्री कला समाज शैक्षणिक सन्मान, कांचन राहुल शिंदे महाराष्ट्र भारत श्री सन्मान या संस्था व व्यक्तींनी समाजात काहीतरी उल्लेखनीय कार्य केलेले आहे म्हणून त्यांचा विविध पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad

close