अल-हिलाल नागरी पतसंस्थेच्या चेअरमनपदी हाजी मुस्ताक इनामदार व व्हाइस चेअरमन पदी वजीर नदाफ यांची बिनविरोध निवड

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर शहरातील अत्यंत नावाजलेली पतसंस्था म्हणून नावलौकिक प्राप्त झालेली अल-हिलाल नागरी सहकारी पतसंस्थेची निवडणूक त्याच्या पंचेचाळीस वर्षाच्या परंपरेनुसार बिनविरोध करण्यात आली. सर्वचे-सर्व १६ सदस्य बिनविरोध निवडून आले.
निवडणूक निर्णय अधिकारी ए.ए.गावडेसाहेब यांच्या मार्गदर्शनासाठी खाली व्ही.टी.चावरे( निवडणूक निर्णय अधिकारी) यांच्या प्रमुख उपस्थितीत हाजी मुस्ताक ईनामदार यांची तर व्हाइस चेअरमनपदी वजीर नदाफ यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
मावळते चेअरमन लियाकतअली वड्डो,व्हा.चेअरमन ताजुद्दीन गडवाल व ऑनररी सेक्रेटरी आ.गनी होटगी यांच्या विशेष परिश्रमाने निवडणूक बिनविरोध झाली. त्यासाठी त्यांचा सत्कार चावरे यांच्या हस्ते करण्यात आला.
संस्थेचे जेष्ठ संचालक म. रफिक खान अ.मजिद कल्याणी, मौलाली लोकापल्ली यांनी याप्रसंगी संस्थेच्या प्रगतीबाबत आपले मनोगत व्यक्त केले.या प्रसंगी अ.मन्नान पठाण, हाजी दाऊद मंगलगिरी,महीबूब कुमठे, गुलाम दस्तगीर गदवाल, गुफरान ईनामदार,इजहार सौदागर, नाहीदपरवीन प्यारे,हलीमा भाग नगरी व संचालक मंडळ उपस्थित होते. मौलाली लोकापल्ली यांनी आभार प्रदर्शन केले,तर सूत्रसंचालन म.रफिक खान यांनी केले.
मुस्ताक ईनामदार व वजीर नदाफ यांच्या निवडीने सोलापूर शहरातील विविध संघटनांच्या वतीने अभिनंदन केले जात आहे.
0 Comments