अर्धापुरात राष्ट्रीय किर्तनकार ह.भ.प. चारुदत्त आफळे यांचे भव्य कीर्तन
विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान सोहळा

अर्धापूर (कटूसत्य वृत्त):- मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त राष्ट्रीय कीर्तनकार हभप चारुदत्त आफळे पुणे यांचे कीर्तन व विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार सोहळ्याचे आयोजन शनिवारी (ता १५) करण्यात आले आहे.या सोहळ्यास वेदांताचार्य दिगांबार शिवाचार्य महाराज यांची प्रमुख उपस्थिती राहणार अशी माहिती अर्धापूर सहकारी पतसंस्थाचे माजी अध्यक्ष आर आर देशमुख यांनी दिली .
यंदाचे हे मराठवाडा मुक्ती संग्रामाचे अमृतमहोत्सवी वर्ष असून या निमित्ताने कीर्तन सोहळा व विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.यात गेली ३२ वर्षं अखंडीत आळंदी ते पंढरपूर पायी वारी करणारे विश्वनाथ सिनगारे, गेल्या २२ वर्षांपासून अमरनाथ यात्रा करणारे एन, डी.कानोडे, पायी नर्मदा परिक्रमा पूर्ण करणारे पद्माकर देशमुख यांचा समावेश आहे.हा कीर्तन व विशेष सन्मान सोहळा शहरातील तामसा रस्त्यावरील नरहरी स्वयंवर मंगल कार्यालयात शनिवारी संध्याकाळी होणार आहे या सोहळ्यात कृष्णा देशमुख यांचे मार्गदर्शन करणार आहेत सायंकाळी सहा ते आठ विशेष सन्मान सोहळा व रात्री आठ ते दहा राष्ट्रीय कीर्तनकार हभप चारुदत्त आफळे यांचे कीर्तन होईल.या किर्तन सोहळ्यास उपस्थित राहावे असे आवाहन आर आर देशमुख,अर्धापूर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष गुणवंत विरकर व संयोजन समितीने केले आहे.
0 Comments