Ads

Ads Area

आज पेढे घेऊन आलो आहे, उद्या घोडे घेऊन येऊ - राजकुमार स्वामी

आज पेढे घेऊन आलो आहे, उद्या घोडे घेऊन येऊ - राजकुमार स्वामी

प्रहार जनशक्ती पक्ष तालुका अध्यक्ष मंगळवेढा

             मंगळवेढा (कटूसत्य वृत्त):- दत्ता मस्के पाटील व अजित कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली एसबीआय बँकेसमोरआंदोलन करण्यात आले, एसबीआय बँकेला गेल्या अनेक दिवसापासून बँकेत फलक लावावेत व तसेच माहिती पुस्तका उपलब्ध करून देण्यात यावी म्हणून पाठपुरावा करत होतो,परंतु लावण्यात न आल्याने आंदोलन करण्यात आले. खर तर बँकेचे मूलभूत तत्त्वच हे आहे की लोकांना बँकेतून मिळणाऱ्या सुविधा ह्या लोकांपर्यंत पोहचवने, अन हे गरजेचे आहे, लोकांना माहिती होण आणि लोकांना त्याचा फायदा होण हे गरजेचे आहे परंतु बँक त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही त्यामुळे अनेक गरजू लोक शासनाने ज्या सुविधा दिल्या आहेत त्या सुविधांपासून ते वंचित राहतात हे लोक वंचित राहू नयेत यासाठी आम्ही आरबीआयच्या नियमानुसार बँकेत माहिती फलक लावावेत व माहिती पुस्तक उपलब्ध करून द्यावी ही मागणी करत आहोत.

             यावेळी प्रहार चे कार्याध्यक्ष अमोगसिद्ध काकनकी यांनी सिद्धापूर शाखेतील अडचणी सांगितल्या  कोणतीही पूर्व सूचना न देता हेल्थ इन्शुरन्स नावा खाली अकाउंट वरून पैसे कट करून घेतले जातात तसेच यासंदर्भात तक्रार केली असता नुसते आश्वासन दिले जातात परंतु प्रत्यक्षात मात्र कोणतीही कार्यवाही करण्यात येत नाही.याचबरोबर आरबीआयचे नियमाप्रमाणे सिद्धापूर शाखेत देखील माहिती फलक लावण्यात आलेले नाहीत जो पर्यंत फलक लावण्यात येणार नाहीत तो पर्यंत आमचा लढा असाचं चालू राहील.

             प्रहारचे सोलापूर जिल्ह्याचे शहर अध्यक्ष अजित भाऊ कुलकर्णी यांनी यावेळी आम्ही तुम्हाला सवलत देतो,जर आठ दिवसात फलक लावण्यात आले नाही तर प्रहार स्टाईलने आक्रमक पवित्रा घेत आंदोलन करू असा इशारा देण्यात आला. सहा - सात वेळा निवेदन देऊन जर मागणी मान्य होत नसेल तर आंदोलन करावेच लागेल, आज पेढे घेऊन आलो आहे, उद्या घोडे घेऊन येऊ असा इशारा प्रहारचे तालुका अध्यक्ष राजकुमार स्वामी यांनी यावेळी दिला. 

             यावेळी प्रहार चे संघटक अजित टकले यांनी स्टेट बँक ऑफ इंडिया मंगळवेढा येथील अधिकारी वर्गाने आपल्या पदाला शोभेल असे कार्य करावे. त्या अधिकाऱ्यांच्या नियुक्ती ही लोकांची सेवा करण्यासाठी झालेली आहे हे त्यांनी विसरू नये.

             शेतकरी ,अशिक्षित , मजूर वर्ग, महिला, अपंग व्यक्ती, सर्वांना  आपल्या बँकेमार्फत जास्तीत जास्त सेवा व योजनांचा लाभ कसा पोहोचवता येईल याचे कडे लक्ष अधिकाऱ्यांनी द्यावे . असे मत व्यक्त केले.

             यावेळी प्रहारचे सोलापूर जिल्हाचे कार्याध्यक्ष खालिद भाई मणियार,जिल्हा प्रसिध्दी प्रमुख राजेंद्र सावंत,युवा नेते अजित टकले,संपर्क प्रमुख तानाजी माने, उपाध्यक्ष चेतन वाघमोडे,दत्ता पाटील,दीपक सरगर,बापूसाहेब घोडके,महिला प्रमुख सारिका कवचाळे,विभाग प्रमुख नवनाथ सिरसटकर,संपर्क प्रमुख महेश तळ्ळे , सिध्देश्वर सरवळे,सिध्देश्वर पाटील, आप्पाराया काकणकी , शशी कोळी, रविकांत जाधव, मल्लू तळ्ळे, सिद्धाप्पा काकणकी, संभाजी गावकरे,बंडू चौगले, महम्मद धलाईत,दत्ता कोरे, हाजु ढालाईत, नागु म्हमाणे, बालाजी मळगे पिंटू कपले राकेश कपले प्रज्वल मलकारी,बाबा इनामदार,समाधान वायदंडे, रमेश कोळी, मधुकर वायदंडे, भारत टकले, पिंटू हल्लिकर, सविता मोहिते,विठ्ठल पाटेकर,अमोल नकाते,वैभव मोहिते, सोनाली बंदाई , शोभा अडके,मिनाबई शिंदे,कल्पना कोळी,अनिता नागणे,नंदिनी सिरसटकर,कोरे, आधी कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad

close