भारतात वाचन चळवळ सक्षम असल्याने लोकशाही कधीही धोक्यात येणार नाही- ग्रंथालय संचालक दत्तात्रेय क्षीरसागर
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- भारतात वाचन चळवळ सक्षम असल्याने लोकशाही कधीही धोक्यात येणार नाही असे प्रतिपादन ग्रंथालय संचालक दत्तात्रेय क्षीरसागर यांनी केले.
भारतीय प्रजासत्ताकाचा ७३ वा वर्धापनदिवस सोलापूर जिल्हा ग्रंथालय संघ व हुतात्मा वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमान सोलापूरातील अशोक चौक परिसरातील हुतात्मा स्मारक येथे जल्लोषमय वातारणात साजरा करण्यात आला त्या प्रसंगी दत्तात्रेय क्षीरसागर बोलत होते.
पुढे बोलताना क्षीरसागर म्हणाले की, देशासाठी हौतात्म्य पत्करणार्या हुतात्मा स्मारकातील ध्वजारोहण करण्याची संधी मला मिळणं म्हणजे मी माझे भाग्यच समजतोय. आपला भारत देश आमृत महोत्सवी वर्षाकडे वाटचाल करीत असताना "हर घर तिरंग घर घर तिरंग" चा नारा दिला आहे. त्याच धर्तीवर "हर घर ग्रंथालय घर घर ग्रंथालय" ची चळवळ उभा करण्याची गरज असल्याचेही सांगितले.
याप्ररंभी हुतात्मा वाचनालयाच्या प्रांगणात महाराष्ट्र राज्याचे ग्रंथालय संचालक दत्तात्रय क्षीरसागर यांच्या हस्ते व जेष्ठ कवी देवेंद्र आवटी यांच्या अध्यक्षतेखाली ध्वजारोहण करण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.
यावेळी मुंबई ग्रंथालय संचालनायाचे अधीक्षक योगेश पिंपळे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी संतोष जाधव, तांत्रिक सहाय्यक प्रमोद पाटील, वरिष्ठ लिपिक प्रदीप गाडे , ग्रंथमित्र कुंडलिक मोरे, जिल्हा संघाचे उपाध्यक्ष पांडुरंग सुरवसे, सारिका मोरे, संचालिका जिल्हा ग्रंथालय संघ, धोंडीबा बंडगर, ग्रंथमित्र जयंत आराध्ये, प्रकाश शिंदे संघाचे खजिनदार, कार्यवाह साहेबराव शिंदे, राजश्री हाके, सोनल पिंगळे, मठपती, मैनाबाई साळुंखे, अॅड. संगीता कुमठेकर व तेजू चव्हाण आदीसह मोठ्या संख्येने वाचकवर्ग उपस्थित होते. तर कार्यक्रमाचे नेटके नियोजन वृषाली हजारे यांनी केले.
0 Comments