Hot Posts

6/recent/ticker-posts

सोलापूर जिल्हा ग्रंथालय संघाने राज्यात नावलौकिक मिळवावा - ग्रंथालय संचालक दत्तात्रय क्षीरसागर

सोलापूर जिल्हा ग्रंथालय संघाने राज्यात नावलौकिक मिळवावा - ग्रंथालय संचालक दत्तात्रय क्षीरसागर

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातील ग्रंथालये कशा पध्दतीने सक्षमपणे उभा राहतील. याकडे
सोलापूर जिल्हा ग्रंथालय संघाने लक्ष देवून ग्रंथालय चळवळीचे काम संपूर्ण महाराष्ट्र राज्यात आदर्शवत करून नावलौकिक मिळवावा अशी अपेक्षा महाराष्ट्र राज्याचे ग्रंथालय संचालक दत्तात्रय क्षीरसागर यांनी व्यक्त केली.
दत्तात्रय क्षीरसागर हे सोलापूर दौऱ्यावर आले असता शासकीय विश्रामगृह येथे त्यांचा सोलापूर जिल्हा ग्रंथालय संघासह विविध संघटनांनी सत्कार केला त्याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी अधिक्षक योगेश पिंपळे यांचाही सत्कार करण्यात आला.
यावेळी जिल्हा ग्रंथालय अधिकारी संतोष जाधव, निरीक्षक प्रमोद पाटील, लिपिक प्रदीप गाडे, राष्ट्रवादी युवक प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत बाबर, अदीसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी सोलापूर जिल्हा ग्रंथालय संघाचे उपाध्यक्ष पांडूरंग सुरवसे व खजिनदार प्रकाश शिंदे यांची नव्यानेच निवड झाल्याबद्दल महाराष्ट्र राज्याचे ग्रंथालय संचालक दत्तात्रय क्षीरसागर यांनी आवर्जून सत्कार केला.
पुढे बोलताना क्षीरसागर म्हणाले की, कमीत कमी सोलापूर जिल्हा ग्रंथालय संघाच्या संचालक मंडळानी तरी आपआपली ग्रंथालय सुसज्ज ठेवावी. तसेच जिल्हा ग्रंथालय संघाची घटनेत बदल करून अध्यक्ष, सचिव व ग्रंथपाल यांना मतदानाचा अधिकार देण्यात यावा. यासाठी शासन स्तरावरून मी वैयक्तिक योग्य मार्गदर्शन व सहकार्याही करणार असल्याचे शेवटी क्षीरसागर यांनी सांगितले.
Reactions

Post a Comment

0 Comments