Hot Posts

6/recent/ticker-posts

उजनी डावा कालवा पाटकुल हद्दीत फूटून शेतकऱ्यांच्या शेतीचे प्रचंड नुकसानकालव्याच्यानजीक शेतकऱ्यांच्या घरे पाण्यात संपर्क तुटला

उजनी डावा कालवा पाटकुल हद्दीत फूटून शेतकऱ्यांच्या शेतीचे प्रचंड नुकसान
कालव्याच्यानजीक शेतकऱ्यांच्या घरे पाण्यात संपर्क तुटला
टाकळी सिंकदर (कटूसत्य वृत्त):- उजनी पाटबंधारे विभागाचा डावा कालवा पाटकुल ता.मोहोळ हद्दीत गंगाधर सातपुते वस्ती नजीक फुटला आहे. यामुळं शेतकऱ्यांच्या शेतात पाणीच पाणी झालं आहे
हा कालवा कालव्यावर बांधण्यात आलेल्या पुलातून पुढे पाणी जाऊ शकत नसल्याने फूटला असल्याचा आंदाज तेथील शेतकऱ्यांकडून सांगण्यात आले डावा फुटला. मोहोळ तालुक्यातील पाटकुल या गावात उजनी पाटबंधारे विभागाचा हा उजवा कालवा फुटला आहे. हा कालवा फुटल्यामुळं शेतकऱ्यांच्या शेतात पाणीच पाणी झालं आहे. यामुळं शेतकऱ्यांच्या शेतातील डाळिंबासह ऊस आणि इतर पिके वाहून गेली आहेत. शेतकऱ्यांच्या घरातही मोठ्या प्रमाणात पाणी शिरलं आहे. 
उजनी धरणातून उजव्या कालव्यामध्ये ५०० क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरु होता. मात्र, अचानक पाटकुल गावात उजवा कालवा फुटल्यानं शेतखऱ्यांच्या शेतात पाणी शिरून पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. पाटकुल येथील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. उजनी धरणातून येणारा मोठा उजनी उजवा कालवा ११२ किमीचा विसर्ग आहे.आज रविवारी ता.२९ ला पहाटे पाटकुल ओढ्याजवळ हा कालवा फुटला असून, त्यामुळं शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांसह विहिरींचं देखील मोठं नुकसान झालं आहे. या परिसरात शेकडो एकर शेतीचे क्षेत्र उभ्या पिकांसह पाण्याखाली गेलं आहे.
कालवा फुटल्यानं काढणीला आलेल्या द्राक्ष बागांचेही प्रचंड नुकसान झाले असून कालव्यातील व शेतकऱ्यांच्या विहिरीवरील इलेक्ट्रिक मोटारी वाहून गेल्या आहेत. अजूनही पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात सुरू आहे. यामुळं उभ्या सर्व प्रकारच्या पिकातून पाणी मोठ्या प्रमाणात वाहत असल्यानं ऊस शेती सह शेतजमिनीचे प्रचंड मोठं नुकसान झालं आहे. हे पाणी सध्या शेकडो एकर शेतामध्ये पाणी साचल आहे. या झालेल्या नुकसानीला जबाबदार कोण? असा प्रश्न विचारला जात आहे. प्रशासनाकडून तत्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याची मागणी येथील शेतकऱ्यांनी केली आहे.
पाटकूल ता मोहोळ गावाच्या पश्चिमेस दोन कि.मी.अंतरावर गंगाधर सातपूते,संजय मच्छिंद्र सातपुते ,बंडू सातपुते यांच्या वस्ती जवळपास हा डावा कालवा फुटला आहे. या कालव्यातून ५०० क्युसेसचा विसर्ग सुरू आहे. ही कालवाफूटीची घटना आज सकाळी ५ ते ६ च्या दरम्यान घडली. 
कालव्याच्या जवळ पास राहणाऱ्या वस्त्या व माणसे,जनावरे पाण्याच्या वेढ्यात सापडल्याने संपर्क तुटला आहे.
Reactions

Post a Comment

0 Comments