मोहोळ तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने काँग्रेस स्थापना दिन उत्साहात..! - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, December 28, 2022

मोहोळ तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने काँग्रेस स्थापना दिन उत्साहात..!

मोहोळ तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने काँग्रेस स्थापना दिन उत्साहात..!

मोहोळ (कटूसत्य वृत्त):- काँग्रेसचा इतिहास भारत देशाला कधीही विसर पडणार नाही. कारण काँग्रेसने या देशासाठी फार मोठं बलिदान आणि योगदान दिलेला आहे. आणि म्हणूनच लाट निघाली लाटेवर विकासाच्या वाटेवर असा नारा देत काँग्रेसचे युवा नेतृत्व राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली कन्याकुमारी ते काश्मीर भारत जोडो यात्रा उत्साहात चालू आहे.
या यात्रेला देशातील सर्वधर्म प्रांत जाती वंशपरंपरेतील नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिल्याचे सुद्धा दिसून आले आहे.
काँग्रेसच्या इतिहास स्वातंत्र्यप्राप्तीसाठी काँग्रेसने केलेल्या कार्याची माहिती आणि जुना सर्वधर्मसमभाव भावनेनं अखंड भारताचे स्वप्न काँग्रेसने उभा केले त्याच धर्तीवर सध्या भारत जोडो यात्रा विविधतेतून एकता साधत असल्याचे दिसत असल्यामुळे आम्ही काँग्रेसमध्ये काम करत असल्याचा आम्हाला अभिमान असल्याचे मत काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सुरेश शिवपुजे यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमासाठी जिल्हा उपाध्यक्ष सिद्राम पवार,  जिल्हा उपाध्यक्ष ओबीसी विभाग बिलालभाई शेख, ओबीसी अध्यक्ष बिरासाहेब खरात, महिला अध्यक्ष रत्‍नाबाई कसबे, उपाध्यक्ष नामदेव खांडेकर, प्रशांत झुंजार, अमोल मोरे, महेश भोसले व किशोर पवार आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages