Hot Posts

6/recent/ticker-posts

सोलापूरात रविवारी गुरव समाजाचे महाअधिवेशन; मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

 सोलापूरात रविवारी गुरव समाजाचे महाअधिवेशन

मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन


सोलापूर (कटूसत्य वृत्त):- राष्ट्रीय गुरव समाज महासंघाच्या वतीने गुरव समाजाचे महाअधिवेशन रविवार दि.११ डिसेंबर २०२२ रोजी दुपारी १ वाजता डि.एड् कॉलेज मैदान नेहरु नगर विजापूर रोड, सोलापूर येथे होणार आहे, अशी माहिती स्वागत समितीचे अध्यक्ष माजी आमदार विजयराज शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

      अ.भ.प.अध्यात्म विवेकी गुरुवर्य ज्ञानेश्वर विष्णु महाराज कोल्हापूर (दादा) अध्यक्ष संत

ज्ञानेश्वर महाराज जन्मभुमी संस्था, श्रीक्षेत्र आपेगाव यांच्या दिव्य सानिध्यात या अधिवेशनाचे उद्घाटन  उपमुख्यमंत्री दवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे  यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. यावेळी केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील , जलसंपदा मंत्री, कर्नाटक

गोविंद एम. कारजोळ, शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर, आरोग्य व ओबीसी कल्याणमंत्री तानाजी सावंत , सहकार मंत्री अतुल सावे , खासदार डॉ. जयसिध्देश्वर शिवाचार्य महास्वामी, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर , खासदार ओमराजे निंबाळकर ,आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सुभाष देशमुख,आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार प्रणितीताई शिंदे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व आजी - माजी आमदारांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

   या महा अधिवेशनामध्ये विविध नऊ ठराव करून ते राज्य शासनाकडे पाठविण्यात येणार आहेत. तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गुरव समाजातील मान्यवरांचाही यावेळी सन्मान करण्यात येणार असल्याचे माजी आमदार विजयराज शिंदे यांनी सांगितले.

  या पत्रकार परिषदेस मल्लिकार्जुन गुरव, बाळासाहेब शिरसागर, यशवंत ढेपे, चंद्रकांत गुरव, देवेंद्र औटी, सुनील गुरव आदी उपस्थित होते.

 

Reactions

Post a Comment

0 Comments