Hot Posts

6/recent/ticker-posts

रघोजी हॉस्पिटलमध्ये किडनी ट्रान्सप्लांट शस्त्रक्रियेस शासनाची मान्यता

 रघोजी हॉस्पिटलमध्ये किडनी ट्रान्सप्लांट शस्त्रक्रियेस शासनाची मान्यता



सोलापूर (कटूसत्य वृत्त):- रघोजी किडनी आणि मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये किडनी ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया, ह्रदयाची शस्त्रक्रिया (बायपास सर्जरी) व मेंदुचे शस्त्रक्रिया विभाग सुरु करण्यात आल्याची माहिती डॉ. विजय रघोजी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

      २००३ साली सुरू झालेल्या रघोजी किडनी हॉस्पिटलचे २०१९ मधे होटगी रोड येथे भव्य १०० बेड चे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये रूपांतर झाले. या नूतन हॉस्पिटलच्या तिसऱ्या वर्धापन दिना निमित्त नुकतेच या रुग्णालयास अतिशय महत्वाची आणि गरजेची किडनी ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया करण्यास मान्यता मिळाली आहे.

मागील वर्षी कॅथलॅब सुरू झाल्यापासून 500 अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टी करण्यात आल्या आहेत. या शिवाय हृदयाची बायपास शस्त्रक्रिया, मेंदूच्या शस्त्रक्रिया करण्यासाठी अत्याधुनिक मायक्रोस्कोप तसेच पोटाचे बिन टाक्याचे उपचार करण्यासाठी विविध दुर्बिणी पण उपलब्ध आहेत. या सर्व सुविधा त्या विषयाच्या तज्ञांमार्फत नियमित पुरविल्या जात आहेत. बऱ्याच शस्त्रक्रियेसाठी शासकीय मोफत

योजना पण उपलब्ध आहेत. नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉक्टर रघोजी यांनी केले आहे.

   यात्रा या पत्रकार परिषदेस गजानन पिंगुरवार, डॉ. संध्या रघोजी, डॉ. निहारिका पिंगुरवार, सुनीलकुमार आदी उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments