'व्हाॅईस ऑफ मीडिया' सोलापूर शहराध्यक्षपदी प्रशांत माने
महाराष्ट्रासह देशभरातील २१ राज्यांमध्ये कार्यरत पत्रकारांच्या राष्ट्रीय पत्रकार संघटनेचे जाळे आता सोलापुरात
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- व्हाॅईस ऑफ मिडिया च्या सोलापूर शहराध्यक्षपदी पत्रकार प्रशांत माने यांची निवड करण्यात आली आहे. प्रशांत माने हे गेल्या अनेक वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत आहेत. या संघटनेवर निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.
व्हाॅईस ऑफ मीडिया ही संघटना पंचसूत्री घेऊन पत्रकारांच्या हितासाठी काम करणारी राष्ट्रीय संघटना आहे. व्हाईस ऑफ मीडियाच्या माध्यमातून शहरभर पत्रकारिता आणि पत्रकारांसाठीची चळवळ उभी करू, असे मत प्रशांत माने यांनी निवडी प्रसंगी व्यक्त केले. व्हॉइस ऑफ मीडिया ही संघटना देशातील 21 राज्यांमध्ये कार्यरत आहे. पत्रकारांच्या आणि पत्रकारितेच्या हितासाठी लढणाऱ्या या संघटनेत सोलापूर शहराध्यक्षपदाची जबाबदारी प्रशांत माने यांच्याकडे देण्यात आली आहे. प्रशांत माने हे सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष अध्यक्ष असून विद्यमान सल्लागार आहेत. सोलापूर श्रमिक पत्रकार सहकारी गृहनिर्माण संस्थेचे प्रशांत माने हे मुख्य प्रवर्तक आहेत. सोलापुरातील १९० पत्रकारांसाठी सात रस्ता या शहराच्या मध्यवर्ती भागात गृहसंकुलाचे बांधकाम सध्या प्रगतीपथावर आहे.
व्हाॅईस ऑफ मीडिया या संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे, व्हाॅईस ऑफ मीडियाचे राष्ट्रीय सरचिटणीस चंद्रमोहन पुप्पाला आणि संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राजा माने यांच्या स्वाक्षरीचे पत्र देऊन प्रशांत माने यांचे संघटनेत स्वागत करण्यात आले. संघटनेत काम करू इच्छिणाऱ्या पत्रकारांनी प्रशांत माने यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहनही माने यांच्याकडून करण्यात आले आहे. संघटनेचे सोलापूर जिल्हाध्यक्ष रविंद्र लवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरच संघटनेची शहर कार्यकारिणी जाहीर करण्यात येणार आहे.
--------------------------------
0 Comments