Hot Posts

6/recent/ticker-posts

मोहोळच्या कादे हॉस्पिटलमध्ये १० डिसेंबर रोजी स्त्री रोग व प्रसुती शास्त्र विभागाचा शुभारंभ

 मोहोळच्या कादे हॉस्पिटलमध्ये १० डिसेंबर रोजी स्त्री रोग व प्रसुती शास्त्र विभागाचा शुभारंभ

मोहोळ, (कटूसत्य वृत्त):- मोहोळ येथील कादे हॉस्पिटलमध्ये बाल रुग्णसेवेबरोबर आता स्त्री रोग व प्रसुती शास्त्र विभाग सुरू करण्यात येत आहे. शनिवारी (ता. १० डिसेंबर ) सायं. ५ वा. अद्यावत स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभागाचा प्रारंभ करण्यात येत आहे. सहकार पंढरीचे वारकरी (कै.) ज्ञानोबा कादे (दाजी) व त्यांचे बंधू (कै.) सोपान कादे यांच्या आशीर्वादाने कादे कुटुंबीयांकडून मागील ३२ वर्षांपासून रुग्णसेवा सुरू आहे. डॉ. दिलीप कादे व डॉ. निर्मला कादे हे दाम्पत्य मोहोळ आणि मोहोळ परिसरातील जनतेची रुग्णसेवा करत आहे. या रुग्णसेवेत विस्तार करण्यासाठी आता पुढील पिढी ही सरसावली आहे. स्त्रीरोग व प्रसुती शास्त्रातील उच्च शिक्षण घेतलेले डॉ. निनाद डी. कादे व डॉ. किंशू एन. कादे हे दोघे या सेवेत सहभागी होत आहेत. डॉ. निनाद कादे व डॉ. किंशू कादे स्त्रीरोग व प्रसूती शास्त्रातील उच्च शिक्षण

घेतले असून सुप्रसिद्ध स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. संदेश कादे यांच्या मार्गदर्शनाखाली दुर्बिणीद्वारे ऑपरेशन करण्याचे प्रशिक्षण घेतले आहे. मोहोळ येथील बस स्थानकाजवळ सुमारे २५ बेडचे सुसज्ज कादे हॉस्पिटल १० डिसेंबरपासून रुग्णसेवेसाठी नव्याने सज्ज झाले आहे. मोठ्या शहरात मिळणाऱ्या सर्व सुविधा आता मोहोळमध्ये उपलब्ध होणार आहेत. सर्व प्रकारच्या तपासण्या करण्यासाठी आद्यवत लॅब, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, स्पेशल रूम व कुशल आणि प्रशिक्षित कर्मचारी वृंद सोबत घेऊन कादे

परिवारातील पुढील पिढी रुग्णसेवेचा वारसा पुढे नेण्यासाठी सज्ज झाली आहे. त्यानिमित्ताने शनिवारी (ता.१०) सायंकाळी पाच वाजता एका स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. या स्नेहमेळाव्यास आपण सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहावे, असे आवाहन कादे परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे. 

Reactions

Post a Comment

0 Comments