ग्रंथपालन परीक्षेत वृषाली गोरे केंद्रात प्रथम

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य , मुंबई यांच्या ग्रंथपालन प्रमाणपत्र परीक्षा 2022 च्या परीक्षेत सोलापूर केंद्रात गोरे वृषाली ज्ञानदेव यांनी 700 पैकी 477 गुण मिळवून केंद्रात प्रथम, बेहेरे समाधान वसंत 410 गुण मिळवून द्वितीय आणि चांगभले प्रज्ञा सुनील 379 गुण मिळवून तृतीय आले. सोलापूर केंद्रातून 43 विद्यार्थी परीक्षेस बसले होते. 18 विद्यार्थी उत्तीर्ण झाले, १३ विद्यार्थी अनुत्तीर्ण होते, 12 विद्यार्थी गैरहजर होते. उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे सोलापूर जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष गुलाबराव पाटील, कार्यवाह विजयकुमार पवार, वर्गव्यवस्थापिका सारिका मोरे, मुख्याध्यापक अविनाश गायकवाड, ग्रंथमित्र कुंडलिक मोरे, वृषाली हजारे, गणेश फंड, संतोष भागवत, दत्ता मोरे, सारिका माडीकर, अमर कुलकर्णी यांनी अभिनंदन केले. उत्तीर्ण विद्यार्थी समर्थ पाटील यांना गुणपत्रक देऊन ग्रंथमित्र कुंडलिक मोरे, शिक्षिका वृषाली हजारे आणि लिपिक सारिका माडीकर यांनी अभिनंदन केले.
0 Comments