सोलापूर( कटूसत्य) :- माजी केंद्रीय गृहमंत्री तथा माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या प्रयत्नातून सोलापूर जिल्ह्यासाठी स्वतंत्र विद्यापीठाची निर्मिती झाली. परंतु आजवर हे विद्यापीठ विविध घोटाळ्यांच्या मालिकामुळेच चर्चेचा विषय बनलंय.
दर्जेदार आणि गुणवत्ता पूर्ण शिक्षणाची चर्चा मात्र या विद्यापीठातून कधीच ऐकायला मिळाली नसल्यामुळे या विद्यापीठातील परीक्षा मंडळाच्या आणि इतर विभागाच्या सातत्याने तक्रारी वाढत आहेत.
सध्या पीएचडी 2022 परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून विद्यार्थ्यांनी या निकालावर आक्षेप घेतला आहे.
या परीक्षेतील पेपर्सच्या फोटोकॉपी आम्हाला मिळाव्यात आणि पुनर मूल्यांकन व्हावे अशी मागणी पीएचडी विद्यार्थ्यांकडून करण्यात आले असून.
आपला आवाज बुलंद करण्यासाठी या तक्रारीचा पाढा विद्यार्थ्यांनी नूतन सिनेट सदस्य अजिंक्यराणा पाटील यांच्यापुढे वाचल्यामुळे डायरेक्ट प्रकरण विद्यापीठाच्या कुलगुरू मृणालिनी फडणवीस यांच्या दरबारात जाऊन पोहोचल.
दरम्यान विद्यापीठाच्या कुलगुरू मृणालिनी फडणवीस यांनी याबाबत सकारात्मक विचार करण्याची ग्वाही सिनेट सदस्य अजिंक्यराणा पाटील यांना दिली.
याबाबत सकारात्मक निर्णय न घेतल्यास विद्यार्थ्यांच्या वतीने न्यायालयीन लढाई लढण्याचा इशारा यावेळी बोलताना अजिंक्यराणा पाटील यांनी दिला आहे.
0 Comments