Hot Posts

6/recent/ticker-posts

शेतकऱ्यांच्या शेतीपंपाची वीज कनेक्शन तोडल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडणार..! अजिंक्यराणा पाटील यांचा इशारा..!! 

शेतकऱ्यांच्या शेतीपंपाची वीज कनेक्शन तोडल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडणार..! अजिंक्यराणा पाटील यांचा इशारा..!! 

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- गोरगरिबांचा आणि आपले सरकार असं ब्रीड लावून सत्तेवर आलेल्या शिंदे आणि फडणवीस सरकार चे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे असून शेतकऱ्यांविषयी पुतना मावशीचा प्रेम असणाऱ्या या सरकारने शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न देता शेतीपंपाचं कनेक्शन तोडण्याचा इशारा महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिल्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत सापडलाय.
त्यात शेतकरी बांधवांना न्याय देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा नेते तथा पंचायत समिती सदस्य अजिंक्यराणा पाटील रस्त्यावर उतरले आहेत.
सोलापूर जिल्ह्याचा मोहोळ तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेती पंपाचे वीज कनेक्शन तोडण्या बाबतचे निवेदन उप अभियंता मोहोळ येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने देण्यात आले.
वीज कनेक्शन व ट्रान्सफॉर्मर कट करणे तात्काळ न थांबवल्यास हजारो शेतकऱ्यांची मोट बांधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मोहोळ येथे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा अजिंक्यराणा पाटील यांनी यावेळी निवेदन देताना दिलाय.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मोहोळ तालुका अध्यक्ष प्रकाश चौरे, शिवाजी चव्हाण, महेश पवार, वैभव गुंड, विकास कोकाटे, प्रशांत बचुटे, नागेश भोसले, फत्तेसिंह देशमुख, मुकेश बचुटे व जयवंत गुंड आदी सह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
Reactions

Post a Comment

0 Comments