भीमा साखर कारखान्याचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावणार-अजिंक्यराणा पाटील - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, November 5, 2022

भीमा साखर कारखान्याचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावणार-अजिंक्यराणा पाटील

भीमा साखर कारखान्याचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावणार- पाटील



    मोहोळ (कटूसत्य वृत्त):-  सय्यद वरवडे येथे भीमा सहकारी साखर कारखाना पंचवार्षिक निवडणुकीच्या भीमा बचाव परिवर्तन पॅनलच्या उमेदवारांच्या प्रचारानिमित्त अजिंक्यराणा पाटील यानी सय्यद वरवडेकर ग्रामस्थ व शेतकरी सभासदांची भेट घेऊन येणाऱ्या १३ तारखेला भिंतीवरील घड्याळासमोर शिक्का मारुन भीमा बचाव परिवर्तन पॅनलच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले. 

ते पुढे बोलताना म्हणाले की, आपल्या पॅनलची सत्ता आल्यावर शेतकरी सभासद, कामगार, यांचे बिलाचे व वेतनाचे सर्व प्रलंबित विषय मार्गी लावण्याचे आश्वासन यावेळी पाटील यानी दिले. तसेच सोलापूर विद्यापीठ सोलापूरच्या अधिसभा (सिनेट) सदस्यपदी अजिंक्यराणा पाटील याची निवड झाल्याबद्दल सय्यद वरवडेकर ग्रामस्थांच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बाळासाहेब शिंदे, हनुमंत कोरे, शिवाजी भोसले, बाळासाहेब कदम, शिवाजी कोरे, शिवाजी वाघमोडे, सलीम पाटील, मेहबूब मुजावर, आप्पा उकळे, सागर विरपे, वाल्मिक निळे, संजय खराडे, नामदेव कुचेकर (गुरुजी) आदींसह सय्यद वरवडे येथील सर्व सभासद बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages