ऊस दर संघर्ष समितीचे रिधोरे येथे चक्का जाम आंदोलन

रस्त्याच्या दुतर्फा जवळपास दोन ते अडीच किलोमीटर वाहनांच्या रांगा
कुर्डुवाडी (कटूसत्य वृत्त):- ऊस दर संघर्ष समिती माढा यांच्यावतीने रिधोरे.ता.माढा येथे चक्का जाम आंदोलन करण्यात आले.ऊसाची पहिली उचल रु. २५०० रुपये व अंतिमदर रु ३१०० प्रती टन मिळावा या प्रमुख मागणी सह,ऊस साखर कारखान्यांचे वजनकाटे ऑनलाईन करावेत,
ओव्हरलोड ऊस वाहतुक करणाऱ्या वाहनांवर आरटीओ मार्फत कारवाई करण्यात यावी.ऊस तोडणी मजुरांचा पुरवठा स्व.गोपीनाथ मुंडे ऊस तोडणी महामंडळ यांच्या मार्फत व्हावा.या प्रमुख मागणीसाठी आज रिधोरे.ता.माढा येथे चक्का जाम आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन तब्बल दीड तास चालले.या आंदोलनामुळे रस्त्याच्या दुतर्फा जवळपास दोन ते अडीच किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
रिधोरे,तांदुळवाडी येथील शेतकरी,हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांवर चालणारे मावळे आहेत.त्यांच्या मागण्यांचा
विचार करून मागण्या पूर्ण करून शेतकऱ्यांना न्याय दयावा.अन्यथा दोन दिवसानंतर तीव्र आंदोलन करण्यात येईल होणाऱ्या नुकसानीत आपण सर्वस्वी जबाबदार असाल असा निर्वाणीचा इशारा संघर्ष समितीचे सत्यवान गायकवाड यांनी दिला. तर साखर कारखानदारांनी शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत न पाहता शेतकऱ्यांच्या मागणीचा सन्मानपूर्वक विचार व्हावा अन्यथा तीव्र आंदोलन कारखानदार व प्रशासन जबाबदार असेल.येत्या दोन दिवसांत कारखानदार व प्रशासनाने शेतकरी हिताचा निर्णय घेऊन आजपर्यंत गांधीगिरी मार्गाने चाललेले आंदोलन.आता ते तिसऱ्या टप्प्यात न जाऊ देता जहालवादाच्या भूमिकेत गेल्यास कारखानदार व प्रशासन जबाबदार असेल असे सत्यवान जाधव यांनी आपल्या मनोगतात सांगितले.
यावेळी अजिनाथ परबत, चेअरमन भारत गायकवाड, शिवाजी पाटील,मा.उपसरपंच राजाभाऊ शिंदे,महावीर सावळे,गणेश परबत,शांतीलाल गवळी,बापू मेजर,सिध्देश्वर घुगे,डिगंबर गवळी, हनुमंत सातव यांनी आपली मनोगते व्यक्त केली.
यावेळी बळीराम गायकवाड, दत्तात्रय गायकवाड,मुसा मुलाणी,विजय भोसले,दत्ताआबा कदम,पिनू जाधव,अमोल गायकवाड,विलास गायकवाड, सलीम शेख, विक्रांत गायकवाड, सुनिल पंडित,संतोष चौधरी, तुकाराम गवळी,सुनील चौधरी, अमजद तांबोळी,अमोल गवळी,दत्तात्रय पंडीत,सुधिर गायकवाड,संदिप गायकवाड, सुभाष तरंंगे,बुद्धीवान करळे, आण्णासाहेब ढोरे,कुबेर गायकवाड,आदि शेतकरी बांधव उपस्थित होते.
यावेळी पोलीस प्रशासनामार्फत कुर्डूवाडीपोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विक्रांत बोधे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.तर महसूल विभागामार्फत आंदोलकांच्या मागण्यांचे निवेदन तलाठी मधुकर काळे यांनी स्वीकारले.
No comments:
Post a Comment