शिवरत्न क्रिकेट अकादमीच्या महिला संघाने पटकावले प्रथम पारितोषिक - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, October 29, 2022

शिवरत्न क्रिकेट अकादमीच्या महिला संघाने पटकावले प्रथम पारितोषिक

 शिवरत्न क्रिकेट अकादमीच्या महिला संघाने पटकावले प्रथम पारितोषिक


अकलूज (कटूसत्य वृत्त):- राण॔द ता.माण .जि.सातारा येथे झालेल्या राज्यस्तरीय महीला क्रिकेट स्पर्धेत अंतिम सामन्यात स्वराज क्रीकेट क्लब दहीवडी या संघाला पराभूत करत अकलूज येथील शिवरत्न शिक्षण संस्था संचलित शिवरत्न स्पोर्ट्स अकादमीच्या महीला क्रिकेट संघाने प्रथम पारितोषिक पटकावले.

या यशाबद्दल सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे ज्वाईट सेक्रेटरी धैर्यशिल मोहिते-पाटील व शिवरत्न संस्थेच्या उपाध्यक्षा शितलदेवी मोहिते-पाटील यांनी शिवरत्न महिला क्रिकेट संघाचे,तसेच प्रशिक्षक यांचे अभिनंदन केले.आझाद क्रिकेट क्लब राण॔द यांच्या वतीने भरवण्यात आलेल्या राज्यस्तरीय महीला क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात स्वराज्य क्रिकेट संघाने दिलेल्या लक्षाचा यशस्वी पाठलाग करत शिवरत्न क्रिकेट क्लब ने विजेतेपद पटकावले अंतिम सामन्यात जान्हवी इंगोले देशमुख हीला सामनावीर पुरस्कार देण्यात आला तर जोया कोरबू यांनी अषटपैलु कामगिरी केली,
अभ्यासाइतकेच जीवनात व्यायाम व खेळ यांनाही महत्त्व आहे. विद्यार्थ्यांच्या मानसिक विकासाबरोबरच मुलांचा, शारीरिक विकासही झाला पाहिजे. व्यायाम, खेळ शारीरिक विकास करतात तर शिक्षण, चिंतन, मननामुळे विद्यार्थ्यांचा मानसिक विकास होतो आम्ही शिवरत्न शिक्षण संस्थेच्या माध्यमातून मुला मुलींना अभ्यासा सोबतच खेळात सुद्धा करीअर करण्याच्या दृष्टीने व्यासपीठ उपलब्ध करून देतो.शितलदेवी मोहिते-पाटील,उपाध्यक्ष शिवरत्न शिक्षण संस्था.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages