संभाजी ब्रिगेडच्या वतीने बळीराजाची मिरवणूक - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, October 29, 2022

संभाजी ब्रिगेडच्या वतीने बळीराजाची मिरवणूक

 संभाजी ब्रिगेडच्या वतीने बळीराजाची मिरवणूक

.


  इडा पिडा टळु दे बळीचे राज्य येवो दे
 उ.सोलापूर येथील सावंतवाडी गावात जपली परंपरा

सोलापूर  (कटूसत्य वृत्त):-  दिवाळी बलिप्रतिपदा निमित्त संभाजी ब्रिगेडच्या वतीने सावंतवाडी (तालुका उत्तर सोलापूर) येथे बळीराजाचे पूजन करून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. इडा पिडा टळो बळीचे राज्य येवो. जगाचा पोशिंदा शेतकरी राजाचा विजय असो अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.संभाजी ब्रिगेड च्या वतीने गेल्या आठ वर्षांपासून प्रदेशाध्यक्ष प्रविण गायकवाड यांच्या सूचनेनुसार समता नायक बळीराजा च्या मिरवणुकीचे आयोजन करण्यात येते. संभाजी ब्रिगेडच्या वतीने बलिप्रतिपदा निमित्त विविध ठिकाणी बळीराजाची मिरवणूक काढण्यात येते सावंतवाडी गावात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बळीराजा आणि जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येऊन शेतकऱ्यांना ओवाळून त्यांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संभाजीराजे भोसले म्हणाले की आज देशात शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष होत आहे शेतकऱ्यांना आत्महत्या करावी लागत आहे पण सरकार मात्र आम्ही बळीराजाला वाचविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे सांगत फिरत आहे सरकारची शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष असून जातिभेद आर्थिक शोषण अशा धोरणांना जोपासले जात आहे हे साम्राज्य नष्ट करण्यासाठी बळीराजाच्या क्रांतिकारी इतिहासापासून प्रेरणा घेण्याची गरज आहे.
यावेळी संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष शाम कदम यांनी समतावादी संस्कृतीचा महानायक म्हणून बळीराजाला ओळखले जात होते वामनरुपी शत्रूने कपट करून बळीराजाचा घात केला शेतकरी जगला तरच जग जगेल त्यासाठी शासनाने हमीभाव देणे आवश्यक आहे असे मनोगत व्यक्त केले.
 या वेळी संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष संभाजी भोसले, शहराध्यक्ष शाम कदम, सिताराम बाबर,अरविंद शेळके नागेश पवार, गजानन शिंदे , सुलेमान पिरजादे आर्यन कदम दत्ता जाधव महेश तेलूर नागनाथ लामकाने महादेव लामकाने विक्रम सावंत इस्माईल बागवान युनूस मुलांनी संतोष पाटील मारुती साबळे शाहू लामकाने धनंजय लामकाने तुकाराम गुंड राजू घाटे दादा गोरे रवींद्र नागणे बापू लामकाने विजय सोट अमोल सावंत खंडू सावंत नागनाथ लामकाने रामेश्वर सावंत नाना पठाण ईत्यादी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages