बँकिंग क्षेत्रातील वातावरण दूषित असताना श्री समर्थ पतसंस्थेचे वाटचाल गौरवास्पद- देवेंद्र कोठे - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, October 17, 2022

बँकिंग क्षेत्रातील वातावरण दूषित असताना श्री समर्थ पतसंस्थेचे वाटचाल गौरवास्पद- देवेंद्र कोठे

 बँकिंग क्षेत्रातील वातावरण दूषित असताना श्री समर्थ पतसंस्थेचे वाटचाल गौरवास्पद- देवेंद्र कोठे

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- श्री समर्थ महिला नागरी पतसंस्थेचा पहिला वर्धापन दिन मोठ्या उत्साहाने साजरा झाला त्यानिमित्त संस्थेच्या कार्यालयात सकाळी दहा ते पाच वाजेपर्यंत मोठ्या संख्येने सभासदांनी व खातेदारांनी तीर्थप्रसादासाठी गर्दी केली होती. सायंकाळी हॉटेल साईप्रसाद येथे मराठा सेवा संघाचे अध्यक्ष प्रशांत पाटील साहेब,  महाराष्ट्र बिल्डर असोसिएशन चे अध्यक्ष दत्ता मामा मुळे अर्थतज्ञ प्रा. शंकर साळुंखे  यांचे उपस्थितीमध्ये ज्येष्ठ नागरिक व मान्यवर महिलांचा सतकार करण्यात आला  कार्यक्रमाच्या सुरुवातीला संस्थेच्या अध्यक्षा  निता दिनकर देशमुख यांनी सर्व पाहुण्यांचे व उपस्थितितांचे स्वागत करून संस्थेचा आर्थिक आराखडा उपस्थिता समोर मांडला. आपल्या मनोगतामध्ये प्रा. शंकर साळुंखे सर यांनी श्री समर्थ पतसंस्था का काढावी लागली याविषयी स्पष्टीकरण दिले सर्व संचालकांचे यांनी कौतुक केले एका वर्षामध्ये एक महिला पतसंस्था एवढा मोठ्या प्रमाणावर व्यवसाय करते अभिमानास्पद आहे.प्रमुख पाहुणे दत्ता मामा मुळे यांनी महिलांचा कारभार कसा असतो कसा पद्धतीने त्या काटकसर करतात वा समाजामध्ये महिलांचे काय महत्त्व आहे याविषयी त्यांनी सांगितले. त्यांनी सर्व संचालिका व व्यवस्थापन मंडळ, कर्मचारी यांचे भरभरून कौतुक केले. पाहुणे प्रशांत पाटील साहेब यांनीही आपल्या मनोगतात सर्व संचालक महिलांच्या पाठीमागे सर्व व्यवस्थापन मंडळातील पुरुष  मंडळी उभे असल्याने ही प्रगती शक्य झाली असे म्हटले. आत्ता बारा कोटी व्यवसाय झाला आहे परंतु भविष्यात बाराशे कोटी लवकरच व्यवसाय पूर्ण करावा म्हणून शुभेच्छा दिल्या. माजी नगरसेवक देवेंद्र कोठे यांनी अल्पावधीत बँकेने 12 कोटीचा व्यवसाय केला त्यामुळे पतसंस्थेचे लवकरच बँकेत रुपांतर होईल अशी अशा व्यक्त केली आपल्या प्रस्ताविक पर भाषणात व्यवस्थापन मंडळ अध्यक्ष श्री दिनकर देशमुख यांनी हे पतसंस्था काढण्यामागील उद्देश, मागील वर्षभरातील प्रगती व संस्थेच्या पुढील ध्येयधोरणाबाबत माहिती दिली. लवकरच संस्थेच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये शाखा विस्तार होईल. संस्थेचे कार्यक्षेत्र जिल्हा असल्याने सर्वांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे असे त्यांनी सांगितले. तसेच यावेळी सोलापूर जिल्हा नागरी बँक असोसिएशनच्या सीईओ पदी शुभांगी दयानंद जावळे यांची नियुक्ती झाल्याबद्दल संस्थेच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच यावेळी ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त. देवानंद  चिलवंत, सिद्राम कोतली. सुभाष गायकवाड, नागनाथ पाटील ,चंद्रकांत दिवटे, यांचा सन्मान करण्यात आला.यांनी संस्थेच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष  रेणुका विलास कोरे संचालक कु.प्रणाली महावीर जाधव,  सुवर्णा जगदीश भोसले, मनीषा बापू साठे, वैशाली संजय साळुंखे,  अरुणा प्रमोद यादव, डॉ. मंजुषा प्रवीण नन्नवरे, डॉ. अरुणा रुपनर,राजश्री विजय जाधव तसेच व्यवस्थापन मंडळ उपाध्यक्ष महावीर जाधव विलास कोरे बापू साठे, प्रवीण न्नवरे,संजय साळुंखे सिताराम हंगरगी, प्रमोद यादव, संतोष भोसले पिग्मी एजंट अजित चौधरी, आदिनाथ सुरवसे, सुनील मोरे बँक कर्मचारी बिरदेव पांगरे तसेच ठेवीदार व खातेदार मोठ्या संख्येने उपस्थित होते आभार प्रदर्शन व्यवस्थापन मंडळ उपाध्यक्ष महावीर जाधव यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages