रुग्णालयात डॉक्टर उपस्थित नसल्यास थेट निलंबन, पदभार स्वीकारताच तुकाराम मुंडेंचा धडाका - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, October 8, 2022

रुग्णालयात डॉक्टर उपस्थित नसल्यास थेट निलंबन, पदभार स्वीकारताच तुकाराम मुंडेंचा धडाका

 रुग्णालयात डॉक्टर उपस्थित नसल्यास थेट निलंबन, पदभार स्वीकारताच तुकाराम मुंडेंचा धडाका 

पुणे (कटूसत्य वृत्त):- तुकाराम मुंढे यांनी काही दिवसांपूर्वी आयुक्त आरोग्य सेवा आणि संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. राज्यातील जनतेला आरोग्य सेवा सहज उपलब्ध करुन देण्यासाठी कटीबध्द राहण्याच्या सूचना त्यांनी दिल्या होत्या. त्यांनतर आरोग्य विभागाचा आयुक्त पदाचा चार्ज घेताच आरोग्य आयुक्त तुकाराम मुंढेच्या कामाचा धडाका सुरू असल्याचे दिसून आले आहे. काल रात्री दीडच्या सुमारास राज्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, जिल्हा रुग्णालय येथे रात्रीच्या वेळी आरोग्य उपसंचालक , जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्यासह वरिष्ठ डॉक्टरांकडून धाडसत्राला सुरुवात केली . रुग्णालयांची पाहणी केल्यावर डॉक्टर उपस्थित नसल्यास निलंबनाची कारवाई होणार असल्याचे मुंढे यांनी सांगितले . राज्यातील सर्व आरोग्यकेंद्रांना शिस्त लागावी . तसेच ती पूर्ण कार्यक्षमतेने सुरु व्हावीत अशी अपेक्षा असल्याचे तुकाराम मुंढे यांनी यावेळी सांगितले . पुण्यातील आळंदी , वाघोली येथील ग्रामीण रुग्णालयात केली तपासणी, तेथे डॉक्टर उपस्थित असल्याने कारवाई टळली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages