मोदी-शहांनी सहकार मुडीत काढून मायक्रो फायन्सासच्या माध्यमातून आधुनिक सावकार निर्माण केले- बॅक तज्ञ उटगी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, October 17, 2022

मोदी-शहांनी सहकार मुडीत काढून मायक्रो फायन्सासच्या माध्यमातून आधुनिक सावकार निर्माण केले- बॅक तज्ञ उटगी

 मोदी-शहांनी सहकार मुडीत काढून मायक्रो फायन्सासच्या माध्यमातून आधुनिक सावकार निर्माण केले- बॅक तज्ञ उटगी 



                     

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांनी सहकार क्षेत्र मोडीत काढून मायक्रो फायन्सासच्या माध्यमातून आधुनिक सावकार निर्माण केले आणि आपल्या बगलबच्च्यांना सरकारी बँकांची कर्जे देऊन वंचितांना बँकेच्या दारातून हाकलून देत असल्याचा सणसणाटी आरोप अर्थतज्ञ तथा बँक अधिकारी व कर्मचाऱ्यांचे राष्ट्रीय नेते आणि बँक ठेवेदाराचे कैवारी विश्वास उटगी यांनी केला.

विश्वास उटगी हे बहुजन विचार मंचच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात आजची भारतीय बँकिंग व्यवस्थित वंचित बहुजनांचे स्थान समस्या व निवारक उपाय या विषयावर सविस्तर मार्गदर्शन करताना बोलत होते तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी बहुजन विचार मंचेचे संस्थापक अध्यक्ष आबासाहेब साबळे हे होते.

पुढे बोलताना विश्वास उटगी म्हणाले की, 1970 साली वंचितांसाठी सरकारी बँकेतील खुली केलेली दारे मागील आठ वर्षापासून मोदी-शहा या जोड गोळीने हळूहळू बंद केले. 2014 मध्ये देशाचे कर्ज 56 लाख कोटी होते ते आज १३९ लाख कोटी रुपये झाले आहे. देशाची अर्थव्यवस्था संपूर्णपणे खिळखिळा करून टाकलेली आहे. ती अर्थव्यवस्था रुळावर आणण्याचे काम हे सरकारला जमत नसेल तर ती जबाबदारी भारतीय नागरिक आणि मतदार म्हणून आपल्यावरच आहे ना? असा प्रश्नही उटगी यांनी यावेळी उपस्थित केला. गुजरातच्या गौतम आडानी मागील आठ वर्षात बँकेची कर्ज बुडवून 40 ते 50 पटीने श्रीमंत होतो. निरव मोदीला भारत सोडून जाण्यास याच भाजप सरकारने मदत केली. आता अंबानींना जपानमध्ये राजमहाल घेतला आहे. तोही या देशातून पळून जाण्याच्या तयारीत आहे. निधी आयोग मार्फत सर्वसामान्यांचा पैसा धन दांडग्याकडे पद्धतशीरपणे वळविला जात असल्याचाही घनाघाती आरोप विश्वास उटगी यांनी पोटतिडकीने केला.

बहुजन विचार मंच तळागाळातील फाटक्या नागरिकांसाठी काम करीत असून त्यांचा आर्थिक स्तर उंचावण्याचा प्रयत्न असल्याचाही आनंद व्यक्त करत त्यांनी बहुजन विचार मंचाला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. पाच लाख रुपये वरील बँक ठेवीदारांच्या रकमेला बँक बुडल्यावर सरकारने व बँकेने जबाबदारी घेतली. पण पाच लाखावरील मोठ्या रकमेच्या ठेवीला जबाबदार सरकार नाही. शंभर टक्के ठेवी जबाबदारी सरकारने घ्यावी. अशीही त्यांनी अपेक्षा व्यक्त केली. सोलापुरात बहुजन विचार मंचाने 12 बचत गट स्थापन केले, निधी बँक स्थापन केली. अल्पावधीतच ही प्रगती उत्कृष्ट असल्याचेही त्यांच्या अनुभवावरून त्यांनी सांगितले व समाधान व्यक्त केले. बहुजन विचार मंचचे कार्यालयात भेट देऊन उटगी यांनी रेकॉर्ड पाहून खूप समाधान व्यक्त केले. सर्व रेकॉर्ड रजिस्टर अद्यावत असल्याचे पाहून तसेच रोखीचे व्यवहार कुठेही नाही अशा प्रकारे पारदर्शक कारभार चालला आहे. बचत गटाची ही प्रगतीचे पावले उत्कृष्ट पद्धतीने चालत असल्याचाही विश्वास उटगी यांनी व्यक्त करत जिल्ह्यात जास्तीत जास्त बचत गट स्थापन करावेत असेही अपेक्षा त्यांनी शेवटी व्यक्त केली.

कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच डॉ. एम. डी. शिंदे यांनी बचत गटाची माहिती व सामाजिक जाणीव या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. आजची शिक्षण पद्धती व बहुजन विचार मंच तर्फे आयोजित मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र बाबतची सविस्तर माहिती दिली.

यावेळी अशोक साबळे, अंगध मुके, मिलिंद ताकपेरे, डॉ. अरुणकुमार इंगळे, डॉ. सुरेश कोरे, सर्वोत्तम रणसुर व श्याम शिंगे आदीसह मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने बहुजन समाजातील वंचित घटक उपस्थित झालेला होता.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages