सोहाळे येथे सर्व्हिस रोडसाठी गावकर्यांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन संपन्न - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, September 6, 2022

सोहाळे येथे सर्व्हिस रोडसाठी गावकर्यांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन संपन्न

 सोहाळे येथे सर्व्हिस रोडसाठी गावकर्यांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन संपन्न

घोड़ेश्वर (कटूसत्य वृत्त):-  सोहाळे येथे सर्व्हिस रोडचे काम पुर्ण करण्यात यावे या मागणीसाठी गावकर्यांच्या वतीने सोहाळे पाटी येथे एक तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी संपूर्ण दोन्ही बाजूंनी पुर्णपणे ट्राफिक जाम झाले होते. रत्नागिरी ते नागपुर  नॉशनल हायवे क्रमांक 166 वरील काम अद्याप अपूर्ण असुन मौजे सोहाळे येथिल पुर्ण एका साईडचे सर्व्हिस रोडचे काम करने अद्याप बाकी असुन याचा त्रास पुर्ण गावकर्यांना होत आहे रोडवरील वाहने फास्ट जात असल्याने रोड क्रॉस करने जीवावर बेतू शकते रोडवरील सर्व गावांचे सर्व्हिस रोड पुर्ण होत असुन आमच्याच गावचा सर्व्हिस रोड का केला जात नाही असा संतप्त सवाल गावकरी विचारू लागले आहेत.

इथे अनेक लहान मोठे अपघात घडलेले आहेत तरीही प्रशासनास जाग येत नसल्याने अनेक नागरिक संतप्त झाल्याचे दिसत होते. नियमानुसार रोडचे काम पुर्ण झालेशिवाय टोल वसूली करता येत नाही तरीही टोलवसूली सुरु असुन सोहाळे येथिल सर्व्हिस रोड दहा दिवसात सुरु न केल्यास टोल बंद पाडण्याचा इशारा गावकर्यांनी दिला आहे, दरम्यान पोलिस अधिकार्यांच्या माध्यमातून चर्चा करून लवकर काम सुरु करण्याचे आश्वासन कंपनीने दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले काम सुरु न केल्यास यापेक्षा मोठे आंदोलन करण्याचा इशारा देन्यात आला आहे, निवेदन कामती पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अंकुश माने यांनी स्वीकारले.   यावेळी भीमा सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन सतीश जगताप, नवनिर्वाचित सरपंच ऋषिकेश जगताप, बाळासाहेब नाईकनवरे, संतोष पाटील, भाऊसाहेब जगताप, सर्जेराव जगताप, गणेश जगताप, उत्तम घुले, बंटी जगताप,किरण पवार, धर्मा सोनवणे, अर्जुन जगताप, संजय बाबर, चंद्रकांत बचूटे, पांडुरंग बाबर, सिध्देश्वर नाईकनवरे, किरण पवार, नितीन बचूटे, राहुल जगताप, बंडू जगताप, रामभाऊ जगताप व गावातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते, यावेळी कामती पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलिस निरीक्षक अंकुश माने यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता, जाधवर, कुंभार, दूधे, दळवी, ट्राफिकचे पवार यानी योग्य नियोजन केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages