बोगस दस्त नोंदणीचा पुन्हा उद्रेक तर स्वाभिमानी ब्रिगेड संघटना आक्रमक - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, September 30, 2022

बोगस दस्त नोंदणीचा पुन्हा उद्रेक तर स्वाभिमानी ब्रिगेड संघटना आक्रमक

 बोगस दस्त नोंदणीचा पुन्हा उद्रेक तर स्वाभिमानी ब्रिगेड संघटना आक्रमक

पुणे (कटूसत्य वृत्त):- बोगस एनए ऑर्डर जोडून सदनिकांच्या बोगस दस्त नोंदणीचा पुन्हा उद्रेक होऊ लागला असून या संदर्भात स्वाभिमानी ब्रिगेड संघटना आक्रमक भूमि केच्या पावित्र्यात आहे.

या प्रकरणातील 112 बांधकाम व्यवसायि कावर गुन्हा दाखल करण्यासाठी दस्त नोंदणी विभाग वरिष्ठ अधिकारी यांनी पाठ फिरवली आहे.या कारणास्तव स्वाभिमानी ब्रिगेड संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व प्रदेश काँग्रेस युवक सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील हे आक्रमक आंदोलनाच्या तयारीत आहेत.

यावेळी यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना रोहन सुरवसे पाटील म्हणाले की मार्च एप्रिल महिन्यातील एनए ऑर्डर घोटाळ्यातील प्रकरणांमध्ये अध्याप कोणत्याही प्रकारचे कारवाई झालेली नाही पुण्यामध्ये पुन्हा बोगस एनए ऑर्डर जोडून दस्त नोंदणी सुरू आहे.1 ते 27 मधील सर्व सब रजिस्टर अधिकाऱ्यांना हाताशी धरून ऑफिसमध्ये राजरोसपणे बोगस दस्त नोंदणी सुरू आहे. प्रशासनाने आतापर्यंत बोगस एन ऑर्डर चे 112 प्रकरणे उघडकीस आली त्या नंतर 26 गुन्हे दाखल केले आहेत.हडपसर पोलीस ठाण्यात मात्र आणखी राहिलेले बांधकाम व्यवसायिकांवर कधी गुन्हे दाखल होणार असा सवाल रोहन सुरवसे पाटलांनी उपस्थित केला आहे.  सह दुय्यम निबंधक कार्यालय हवेली क्रमांक 3 च्या कार्यालयात हा प्रकार आजबी सुरू आहे.या प्रकरणी वरिष्ठ अधिकारी यांना पाठीशी घालत आहेत.बोगस दस्त नोंदणीचा उद्रेक घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर त्वरित गुन्हे दाखल न केल्यास आम्ही सणासुदीच्या मुहूर्तावर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा देत आहे रोहन सुरवसे पाटील यांनी दिला आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages