मैंदर्गी ग्राम दैवत श्री शिवयोगी शिवचलेश्वर पालीखी महोत्सव दिनांक १५ सप्टेंबर रोजी संपन्न होत आहे
.png)
मैंदर्गी (कटूसत्य वृत्त):- मैंदर्गी दि.०७, दर सालाबादा प्रमाणे यंदाही मैंदर्गी ग्रामदैवत श्री शिवयोगी शिवचलेश्वर यांचे पालखी महोत्सव दिनांक १५/०९/२०२२ रोजी संपन्न होत आहे . प्रवचनकार श्री वे . प . पुरोहित रत्न संगय्या शास्त्री हिरेमठ , गवई- श्री शिवानंद मडीवाळ , तब्बलजी विरेश सोन्नद यांच्या स्वमधुर कंठाने रात्री ठीक ८ वाजता प्रवचन संपन्न होत आहे व प्रवचन नंतर महाप्रसादाची खास सोय करण्यात आली आहे . रवीवार दिनांक ११/९/२०२२ रोजी हेडगी जात्रा सर्व भक्तानी श्री शिवचलेश्वर मंदीरात सहभोजन कार्यक्रम आहे व दिनांक १५/० ९/२०२२ रोजी श्री शिवयोगी शिवचलेश्वर यांची भव्य पालखी मिरवणूक आयोजित करण्यात आलेली आहे . सद्भभक्तानी पालीखी कार्यक्रमास यावे व श्रीचे दर्शन घेऊन पुनीत व्हावे व सकाळी ११ ते रात्री ११ पर्यंत महाप्रसादाची खास सोय करण्यात आली आहे . यंदा मैदगीत कसलेली रोगराही नाही . येण्याजाण्यासाठी भरपुर वाहनांची सोय करण्यात आली आहे . या पालीखी महोत्सवात पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आलेली आहे . श्री शिवचलेश्वर देवस्थान पंच कमीटीवतीने पालखी महोत्सवाचे जाहीर प्रसिध्दी करण्यात आलेली आहे .
No comments:
Post a Comment