सांगोल्यात भाजपच्या वतीने पंडित दीनदयाळ उपाध्याय जयंती उत्साहात साजरी

सांगोला (कटुसत्य वृत्त): राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूर्णवेळ प्रचारक, तत्कालीन जनसंघाचे प्रमुख नेते पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती सांगोला शहर व तालुक्यात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी भाजप पक्ष कार्यालयात भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह (बाळासाहेब) केदार-सावंत यांनी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत, जिल्हा परिषद सदस्य अतुल पवार, गजानन भाकरे, डॉ. मानस कमलापुरकर, प्रवीण जानकर, सोयजित केदार, बाळासो चव्हाण, विनोद उबाळे यांच्यासह शक्तीकेंद्र प्रमुख, बूथप्रमुख, भाजपच्या कार्यकर्त्यांनी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांना अभिवादन केले.
No comments:
Post a Comment