पिंपरी (आर) ता येथे ग्रामसभेत विकास कामावर चर्चा

बार्शी (कटूसत्य वृत्त):- जलजीवन मिशन योजेनेअंतर्गत घरोघरी नळ कनेक्शन देणे, वाड्यावस्त्यावर वीज नेणे, प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये प्रपत्रक ड मध्ये काही लाभार्थी वंचित राहिले होते त्या वंचित लाभार्थी तसेच विधवा महिला, अपंग व्यक्ती यांना घरकुल मिळण्यासाठी मंत्रालय पातळीवर प्रा.शरद पाटील यांनी आमरण उपोषणाचा इशारा दिला होता. ग्रामविकास सचिव यांनी दखल घेऊन वंचित लाभार्थी यांना न्याय दिला जाईल असे लेखी आश्वासन दिले , दुबार सर्व्ह करण्याचें आदेश दिले. गावामध्ये दारूबंदी करण्याचा एकमुखी ठराव घेण्यात आला. ग्रामविकास अधिकारी गणेश पाटील यांनी विविध शासकीय योजनेची माहिती दिली.गावातील प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी शासकीय पातळीवर प्रयत्न केले जातील असे सरपंच राधाताई जाधव यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment