ऋणानुबंध फाउंडेशन यांच्या शालेय अभ्यासिकेचे थाटात उद्घाटन

बार्शी (कटूसत्य वृत्त):- जामगाव(पा )मध्ये सुरु केलेल्या अभ्यासिकेचे उद्घाटन गावचे जावई प्राचार्य दिलीप डिसले यांचे शुभ हस्ते,गावचे सुपुत्र डॉ. एम् एस सातपुते सर यांच्या अध्यक्षतेखाली, रामभाऊ लिंबाजी सातपुते , नवनाथ भालेराव,सरपंच,उपसरपंच, ग्रां प सदस्य,पालक,विद्यार्थी, आणि ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत पार पडले. गावच्या विद्यार्थांचा सर्वांगीण विकास व्हावा, या उद्देशाने मुख्य संकल्पना सुजित सातपुते यांनी सर्वप्रथम मांडली होती.यासाठी फाऊंडेशन, ग्रामपंचायत सदस्यांना, शिक्षक,पालक यांना सुजित आणि सदस्यांनी समजावून सांगितली. ग्रामपंचायतींच्या सदस्यांनी दोन वर्षाचे मानधन दिले . रंगरंगोटीसाठी व लाईट साठी बराच खर्च करण्यात आला आहे.लाईट फिटिंग स्वप्नील रामचंद्र हिंगे यांनी विनामूल्य करून दिली.बेंचसाठी जवळपास रू. एक लाख खर्च अपेक्षित आहे.प्रमुख पाहुणे डिसले सरांनी पाच बेंच देण्याचे जाहीर केले आहे .त्यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थी पालक यांना शिक्षणाचे महत्व पटवून सांगितले. भारतीय वनसेवा अधिकारी अमोल सातपुते साहेबांनी पंचवीस हजार किमतींचा डिजिटल स्मार्ट बोर्ड स्टडी रूमसाठी भेट दिला आहे. कार्यक्रम अध्यक्ष एम. एस. सातपुते यांनी विद्यार्थी पालक यांना शिक्षणाचे महत्व पटवून सांगितले व .वैभव यादव सर् यांनी प्रास्ताविक केले ,तर एकनाथ मस्के यांनी मनोगत व्यक्त केले.ज्ञानेश्वर मस्के यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले.
No comments:
Post a Comment