राज्यात 20 हजार पोलिस पदे भरणार - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, September 26, 2022

राज्यात 20 हजार पोलिस पदे भरणार - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्यात 20 हजार पोलिस पदे भरणार - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई (कटूसत्य वृत्त):- राज्यात पोलिस विभागात 20 हजार पदांची भरती केली जाणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. पोलिस विभागातील भरतीबाबत या पूर्वी सात ते आठ हजार पदांच्या भरतीबाबत एक जाहीरात काढण्यात आली आहे.


त्यानंतर आता आणखी 12 हजार पदांसाठीची जाहीरात लवकरात लवकर काढण्यात येईल. या भरतीमुळे पोलिस दलाला चांगली मदत होईल. या भरतीसाठी कार्यवाही करण्यात येणार असल्याचे यावेळी फडणवीस यांनी सांगितले.


सायबर सुरक्षेचा आढावा घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. सायबर गुन्हे तत्काळ उघडकीस यावेत यासाठी काही सुधारणा केल्या जातील, अशी देखील माहिती त्यांनी दिली.


जेल विभागात सुधारणा करण्याची गरज असल्याचेही फडणवीस यांनी म्हंटले आहे. फडणवीस म्हणाले, सध्या जेलधील 1641 कैद्यांची बेल झालेली आहे. परंतु, बेल बॉन्डसाठी त्यांच्याकडे पैसे नसल्याने ते जेलमध्ये आहेत. अशा कैद्यांना कायदेशीर मदत करून त्यांना जेलमधून बाहेर कसे काढायचे यासाठी प्रयत्न केले जातील. यासाठी काही सामाजिक संस्थांची मदत घेणार आहोत, अशी माहिती फडणवीस यांनी दिली. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages