लोकमंगल पतसंस्थेला प्रथम क्रमांकावर नेण्यासाठी सहकार्य करावे : आ. सुभाष देशमुख - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, August 2, 2022

लोकमंगल पतसंस्थेला प्रथम क्रमांकावर नेण्यासाठी सहकार्य करावे : आ. सुभाष देशमुख

लोकमंगल पतसंस्थेला प्रथम क्रमांकावर नेण्यासाठी  सहकार्य करावे : आ. सुभाष देशमुख


20 वी वार्षिक सर्वसाधारण सभा  उत्साहात ; हजार कोटी ठेवींची पूर्तता

                  सोलापूर (कटुसत्य वृत्त): सभासदांनी पतसंस्थेवर दाखविलेल्या विश्वासामुळे लोकमंगल पतसंस्थेने हजार कोटी ठेवींची पूर्तता करुण राज्यात तिसरा क्रमांक प्राप्त केला.  आता  आपली संस्था राज्यात क्रमांक एकवर नेण्यासाठी  सर्वांनी सहकार्य करावे, असे प्रतिपादन आ. सुभाष देशमुख  यांनी केले.

                  रविवार, 31 जुलै  रोजी लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्थेची 20 वी वार्षिक सर्वसाधारण सभा जामगुंडी मंगल कार्यालयात लोकमंगल उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष  आ. सुभाष देशमुख यांच्या  उपस्थितीत पार पडली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी संस्थेचे चेअरमन गुरण्णा तेली, व्हा. चेअरमन निर्मला कुंभार,तज्ज्ञ संचालक मनीष देशमुख, हरिश्चंद्र गवळी, संचालक फैय्याज अहमद सरदार मुलाणी, युवराज गायकवाड, रेवणप्पा व्हनमाने , समाधान पाटील, सिद्राम देवकुळे, भीमाशंकर कलशेट्टी, संचालिका सरोजनी टिपे, सरव्यवस्थापिका अलका नितीन देवडकर, कायदेशीर सल्लागार अडव्होकेट  धनंजय केकडे  यांच्यासह सभासद व खातेदार उपस्थित होते.

                  आ. सुभाष देशमुख म्हणाले की,  सभासदांकडून व ग्राहकांकडून येणार्‍या सूचनांचे पालन करून त्याची दखल घेण्यात येईल, लोकमंगल समूहाचे  रौप्य महोत्सवी वर्ष आहे यानिमित्ताने संस्थेच्या प्रत्येक शाखेच्या ठिकाणी वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत, आर्थिक कारणांमुळे समाजातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी लोकमंगल पतसंस्था नेहमी कटिबद्ध राहणार आहे.  सध्या आपली संस्था राज्यात तिसर्‍या क्रमांकवर आहे, ती क्रमांक एक वर येण्यासाठी सर्व सभासद, ग्राहक, कर्मचार्‍यांनी सहकार्य करावे, असे आवाहन करत जे कर्जदार कर्ज घेऊन नियमितपणे त्याची परतफेड करतात त्यांचे आ. देशमुख यांनी आभार मानले.

                  संस्थेचे चेअरमन गुरण्णा तेली यांनी सभेचे प्रास्ताविक केले. यानंतर  सरव्यवस्थापिका अलका देवडकर यांनी अहवाल वाचन केले. यावेळी संचालक मंडळाने 12% लाभांश  देण्याची शिफारस केली. सभासदांनी यासह सर्व विषयांना एकमताने मान्यता दिली.

                  याप्रसंगी सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या सभासद बाबासाहेब   जाधव, आशा पाटील तसेच उत्कृष्ठ कर्जदार म्हणून  राम माने , शिल्पा किरवे,  आबा वाघमोडे, महेश व्यवहारे, द्रोणाचार्य लेंगरे,  समाधान चव्हाण, गुणवंत विद्यार्थी  आर्या कुरुलकर,   श्रेयस गायकवाड,  शितल सपकाळ, प्रणाली देवडकर, भाग्यश्री पुजारी, पंकज शिंदे, बळिराम देशमुख, अनिल स्वराज, ईश्वरी जगताप, वैभव झेंडगे, स्वप्नाली उटगी यांचा सत्कार करण्यात आला. याबरोबरच सन 2021-22 या आर्थिक वर्षात उत्कृष्ठ कामकाज करणार्‍या   पंढरपुर शाखा नं.1, तेरामैल शाखा, करकंब शाखा व श्रीपुर शाखा या शाखांचा सन्मान करण्यात आला. आभार प्रदर्शन संचालक युवराज गायकवाड यांनी केले. कार्यक्रासाठी सर्व कर्मचार्‍यांनी परिश्रम घेतले. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages